flamingo sakal media
मुंबई

नवी मुंबई ‘फ्लेमिंगो सिटी’ होणार

स्वच्छ भारत मिशनमध्ये शहराची ओळख सांगणार

सुजित गायकवाड

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई, ता. २५ : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धेत १० ते ४० लाख लोकसंख्येत देशात पहिला क्रमांक पटकावल्यानंतर महापालिकेने आणखीन महत्त्वाची पावले उचलली आहेत. स्मार्ट सिटी, प्लॅन सिटी, सायबर सिटी अशा अनेक बिरुदावल्यांमुळे ओळखली जाणारी नवी मुंबई लवकरच ‘फ्लेमिंगो सिटी’ या नावानेही ओळखली जाणार आहे. ऐरोली ते बेलापूरच्या खाडी किनाऱ्यापर्यंत येणारे परदेशी पाहुण्यांमुळे नवी मुंबईला अनोखी ओळख देण्याचा विचार महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी

केला आहे.

या पुढे शहरात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सौंदर्यकरण करताना रंगवल्या जाणाऱ्या भिंती, पदपथ, उड्डाणपूल यांच्यावर फ्लेमिंगोचे चित्र, त्यांचे वास्तव्याच्या जागा आणि जीवनशैली दाखवण्यात येणार असल्याचे आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले. तसेच फ्लेमिंगो पक्ष्यांच्या संवर्धनाकरिता महत्त्वाच्या उपाययोजना महापालिकेतर्फे केल्या जाणार असल्याचेही बांगर यांनी

स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather Update : मुंबईसाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे, कसं असेल तापमान? हवामान विभागाने दिली माहिती

म्हाडा ३० हजार घरे उभारणार, राज्य सरकारकडे १०० एकर जागेसाठी पाठपुरावा सुरू

वडील समजून दुसऱ्यावरच अंत्यसंस्कार; हत्या करून जाळून फेकलेल्या मृतदेहाचे रहस्य कायम

Jintur accident news: जिंतूरजवळ भीषण अपघातात वसमतचे मामा-भाचा ठार; शहरात शोककळा, बाजार बंद

MHADA: म्हाडाची पुन्हा लाॅटरी निघणार! ‘पीएमजीपी’तून मिळणार ९०० घरे, पन्नास टक्के जागेवर उभारणार सदनिका

SCROLL FOR NEXT