Navi Mumbai CRIME Esakal
मुंबई

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Navi Mumbai Crime News:नवी मुंबईच्या पनवेलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.

कार्तिक पुजारी

नवी मुंबई- नवी मुंबईच्या पनवेलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका १३ वर्षीय मुलाने आपल्या १५ वर्षीय बहिणीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीचा मेडिकल रिपोर्ट समोर आल्यानंतर भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोट दुखत असल्याने १५ वर्षीय मुलगी आपल्या आई-वडिलांसह वाशी येथील रुग्णालयात गेली होती. त्यानंतर ती तीन महिन्यांची गरोदर असल्याचं समोर आलं. हॉस्पिटल प्रशासनाने यासंदर्भाल माहिती वाशी पोलिसांना दिली होती. (Mumbai Crime News)

पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, दोघा भाऊ-बहिणीने डिसेंबर महिन्यामध्ये पोर्न व्हिडिओ पाहिले होते. त्यानंतर त्यांनी व्हिडिओतील गोष्टी करुन पाहण्याचं ठरवलं. त्यांना ते अवघड गेल्याने त्यांनी तो प्रयत्न सोडून दिला. पण, जानेवारी महिन्यामध्ये छोट्या भावाने बळजबरी केली अन् मोठ्या बहिणीवर बलात्कार केला.

मासिक पाळी न आल्याने याची माहिती मुलीने आपल्या आईला दिली. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं, असं वाशीच्या पोलिसांनी सांगितलं. माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील हाऊसकिपिंगचे काम करतात. वडील १० हजार रुपये प्रति महिना कमावतात, तर आई ८ हजार रुपये महिन्याला कमावते. याशिवाय वडील मिळेल ते काम घेत असतात, रात्रीचे ओव्हरटाईम देखील ते करतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई-वडील घराच्या बाहेर गेल्यानंतर हा प्रकार घडला आहे. मुलाला बाल कल्याण विभागासमोर सादर करण्यात आले आहे. मुलाविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय बालकांचे लैंगिक गुन्हांपासून संरक्षण (पोस्को) कायद्याअंतर्गत देखील कारवाई करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: इस्ट टू वेस्ट! वाहतूक कोंडीने मुंबईकर त्रस्त; रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Pune Rain Update : पुण्यात रात्रभर पावसाची संततधार, अनेक भागांत साचले पाणी; वाहतूक कोंडीने पुणेकर त्रस्त, वाहनांच्या लागल्या रांगा

Latest Marathi News Live Update : मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचे ढग; पुढील काही तास पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता

Tukaram Mundhe Crackdown : मुंढेंच्या दणक्याने हॉटेल्सही 'सरळ'! आधी सिलिंडर, आता 'एफडीए'मुळे मेन्यूमध्ये कपात; पनीर, चीज, खवा 'गायब'च

Koyna Rain: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार; ५० मिमीहून अधिक पावसाची नोंद

SCROLL FOR NEXT