navneet rana ravi rana Sakal
मुंबई

'15 दिवसांत इमारत पाडा नाहीतर...'; राणा दाम्पत्याला पालिकेचा इशारा

राणा दाम्पत्यांचे खार येथील निवासस्थानाचे बांधकाम अनाधिकृत असल्याचं ठरवत पालिकेने नोटीस दिली होती.

दत्ता लवांडे

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांचे मुंबईतील खार येथील असलेल्या निवासस्थानाचे बांधकाम अनाधिकृत असल्याचं सांगत महापालिकेने नोटीस दिली आहे. १५ दिवसांच्या आत राणा दाम्पत्यानं बांधकाम पाडावं नाहीतर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

(BMC vs Navneet Rana)

दरम्यान राणा दाम्पत्यांचा मुंबई येथील खार येथे असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. त्या अपार्टमेंटचे बांधकाम अनाधिकृत असल्याचं महापालिकेने सांगितलं होतं. त्यानंतर राणा दाम्पत्याला ७ दिवसांची कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. त्या नोटीसीची मुदत संपली असून महापालिकेने पुन्हा एकदा राणा दाम्पत्याला इशारा केला आहे. कारणे दाखवा नोटीसीला राणा दाम्पत्यांनी उत्तरे दिली होती. ती उत्तरे पालिकेने अमान्य करत इशारा केला आहे. दरम्यान महापालिका बांधकाम अनाधिकृत असल्याच्या मुद्द्यावर ठाम आहे.

राणा दाम्पत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठणाचा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांना शिवसैनिकांकडून विरोध करण्यात आला होता. राणा दाम्पत्यांवर वाद पेटवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पालिकेने त्यांच्या राहत्या घराचे बांधकाम अनाधिकृत असल्याचं सांगत नोटीस पाठवली होती. त्या नोटीसीची मुदत संपल्यावर पुन्हा महापालिकेने इशारा केला आहे. पुढील १५ दिवसांच्या आत राणा दांपत्यानं बांधकाम पाडावे नाहीतर कारवाई करण्याचा पालिकेने इशारा केला आहे. दरम्यान याप्रकरणी राणा दाम्पत्य कोर्टात जाऊ शकते किंवा पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाकडे नियमिततेचा अर्ज करू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google वर एक स्टार रिव्ह्यू; कंपनीने महिलेवरच दाखल केला मानहानीचा दावा... काय आहे प्रकरण?

Rahul Gandhi Shirt Shoes Brand : राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमानंतर शर्ट-शूजची चर्चा; ब्रँड कोणता, किंमत किती? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'तो' मुंबईला येतोय, पोलिसांना गुप्त माहिती मिळाली, सापळा रचला अन्...; अमली पदार्थांच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्याला अटक

Humanoid Robot 100m Record : चिनी रोबोटने मोडला उसैन बोल्टचा जागतिक विक्रम; १०० मीटर अंतर अवघ्या ९.३९ सेकंदांत केले पार, VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : कापूरहोळमध्ये रास्ता रोको, पुणे- बेंगलुरू महामार्गावर वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT