Garba sakal
मुंबई

Navratri Festival : गरब्यावरुन पेटला राजकीय वाद; वाद टाळण्यासाठी, महिलांना गरबा खेळू देणार

नवरात्री उत्सवाला अवघे दोन दिवस उरले आहे. मात्र नवरात्रीच्या गरब्यावरुन राजकारण पेटले आहे.

निलेश मोरे

मुंबई - नवरात्री उत्सवाला अवघे दोन दिवस उरले आहे. मात्र नवरात्रीच्या गरब्यावरुन राजकारण पेटले आहे. गरब्यामध्ये हिंदूव्यतीरीक्त इतर धर्मियांना प्रवेश देवू नये अशी भूमिका भाजप नेते नितेश राणे यांनी घेतली आहे. हा वाद बघता गरबा आयोजकांनी सावधगीरीची भूमिका घेतली आहे. घाटकोपरसह मुंबईतील अनेक मंडळाने गरब्यात केवळ महिलांनाच प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे.

महिलांची छेडछाड, मारहाणीच्या अनेक घटना नवरात्रीच्या गरब्यात घडतात. ह्या पार्श्वभूमीवर बजरंग, विश्व हिंदू परिषद सारख्या संघटनांनी गेल्या काही वर्षापासून गरब्यामध्ये इतर धर्मियांना प्रवेश नाकारण्याची भूमिका घेतली आहे. भाजपने अप्रत्यक्षपणे त्याची री ओढली आहे.त्यामुळे नवा वाद ओढवला आहे.

गुजरात सारख्या राज्यात गरब्यामध्ये इतर धर्मियांच्या थेट प्रवेश नाकारला जातो. मात्र सामाजिक सलोखा राखणाऱ्या महाराष्ट्रात हे करणे कठिण असल्याचे काही दुर्गा मंडळाचे म्हणणे आहे. यापर्वी राजावाडी पोलिस मैदानात उपनगरात सर्वात मोठा गरबा आयोजित केला जायचा. मात्र हा गरबा मंडळाच्या अंतर्गत वादामुळे चार वर्षापासून बंद पडला आहे.

सार्वजनिक उत्सवात सहभागी लोकांना जात, धर्म विचारणे महाराष्ट्राच्या पंरपरेत बसत नाही. मुंबईत हाउसींग सोसायटी, मंडळात विविध सर्वधर्मीय लोक राहतात. त्यांना प्रवेश कसे नाकारणार असा प्रश्न घाटकोपर मधील एका नवरात्र उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्याने सकाळशी बोलताना केला.

गेल्या दहा वर्ष आमच्या मंडळाच्या गरब्यात शेजारचे आणि बाहेरुन युवती, महिला येतात. आम्ही केवळ महिलांना गरबा खेळण्याची परवानगी देतो. बाहेरील पुरुष, युवकांना सहभागी होण्याची परवानगी नाही. महिला आनंदाने गरबा खेळतात त्यामुळे कुठला अनूचित प्रकार घडण्याचा विषय राहत नाही.

- उमेश पाटील, खजिनदार एकता मित्र नवरात्र उत्सव मंडळ

सुरुवातीपासून आम्ही आमच्या सोसायटीत मुली, महिला यांच्यासाठी खास गरबा उत्सव सुरू केला. यामध्ये केवळ सोसायटीच्या महिलांना गरबा खेळता येते. त्यामुळे पालकांना देखील काळजी राहणार नाही. बाहेरील सोसायटीच्या लोकांना इथे सहभागी करत नाही. शिवाय कार्यकर्ते देखील सुरक्षेसाठी उपस्थित असतात.

- राजेंद्र पेडणेकर, अध्यक्ष, जय संतोषी माता नवरात्र उत्सव मंडळ

आमच्या मंडळात केवळ आम्ही महिलांना गरबा खेळू देतो. यात सर्व धर्माच्या महिलांनाही आम्ही गरबा खेळण्यास परवानगी देतो. सुरक्षेच्या कारणावरुन आम्ही बाहेरुन पुरुष, युवकांना गरबा खेळू देत नाही.

- आश्विन पटेल, खजिनदार, श्री सार्वजनिक नवरात्र उत्सव मित्र मंडल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dumper Accident : भरधाव डंपरची आठ वाहनांना धडक; कात्रज ते वडगावदरम्यान महामार्गावर थरार

Mangalwedha News : 1650 अल्पभूधारक शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ देण्याची सुनंदा आवताडे यांची भरत गोगावले यांच्याकडे मागणी

Bike Accident : कात्रजमध्ये दोन दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू

Sewage Water Issue : पुणे शहरात ७० ठिकाणी पिण्याच्या पाण्यात मैलापाणी

Jay Pawar: ब्लॅक बॉक्स नष्ट होऊ शकत नाहीत; जनतेला सत्य जाणून घेण्याचा हक्क, सूचक वक्तव्य करत जय पवारांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT