Navratri Utsav 2023 mumbai
मुंबई

Navratri Utsav 2023: मुंबईत नवरात्रीची धामधूम सुरू; अनेक ठिकाणी देवीचं जल्लोषात आगमन !

सकाळ डिजिटल टीम

Navratri Utsav 2023: नवरात्रोत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. उत्‍सवाची जय्यत तयारी सुरू झाली असून उत्साहाने भरलेल्या तरुण मंडळीसह घटस्थापना आणि देवीची स्थापना करणारी मंडळे सज्ज झाली आहेत. रविवारी मुंबई शहरातील सर्व मोठ्या मंडळांच्या देवी त्यांच्या मंडपात विराजमान झाल्या.

लालबाग-परळ वर्क शॉपमध्ये तयार झालेल्या अनेक मोठ्या देवींच्या मूर्तींची मिरवणूक काढून त्‍यांना मंडपात नेण्यात आले. या वेळी अंबा मातेचे रूप एक वेळेस डोळ्यात साठवून घ्यावे आणि ९ दिवस आनंदाने तिची सेवा, पूजाअर्चा करावी, या उद्देशाने जवळपास हजारो नागरिक रस्त्यावर उभे होते.

मुंबईच्या माऊलीची लक्षवेधी मिरवणूक

चुनाभट्टी येथील गजवक्र ढोल-ताशा पथकाने मुंबईची माऊली या देवीच्या आगमन सोहळ्यात वादन केले आणि माऊलीच्या चरणी मानवंदना दिली. मूर्तिकार सिद्धेश दिघोले यांनी साडे सहा फुटाची देवीची मूर्ती साकारली असून कालिया नागावर ती स्वार आहे. या मिरवणुकीचे विशेष आकर्षण होते ते म्‍हणजे ढोलताशा पथकातील मुली. त्‍यांनी कपाळाला मळवट भरून, नऊवारी नेसली होती आणि कमरेला मोठा ढोल बांधून तयार होत्या; तर मुलांनी सदरा घालून ढोल आणि ताशाचे वादन केले. त्यांच्या वादनाने परळ परिसर दणाणून गेला होता. दरम्‍यान, सायन येथील प्रतीक्षानगर नवतरुण मित्र मंडळाच्या देवीच्या आगमन सोहळ्यासाठी विशेष वाद्यवादक ठेवण्यात आले होते.

गणेशोत्सवाच्या आधीपासून आम्ही वादनाची तयारी करत होतो. आता अखेर वादनाची संधी मिळाली. पथकात १० ते १२ मुली आणि २० ते ३० मुले आहेत. इंस्टाइन्फ्लूएन्सर सुरेश पटेकर आणि तन्मय पटेकर यांचे हे पथक असून तन्मयने ही या पथकात वादन केल्याने मुला-मुलींचा उत्साह द्विगुणीत झाला होता.

- रोहित लोखंडे, सदस्‍य गजवक्र ढोल-ताशा पथक

या देवी विराजमान

  • मुंबईची माऊली

  • विलेपार्लेची माऊली

  • साकीनाक्याची जगदंबा

  • भटवाडीची माऊली

  • अंधेरीची जगदंबा

  • दुसरा कामाठीपुरा मुंबईची जगदंबा

  • खेतवाडीची आई (१२ व्या लेनची आई)

सर्वांत उंच मूर्ती

खेतवाडीची आई (१२ व्या लेनची आई) या मंडळाने यंदा ३१ फुटाची मूर्ती विराजमान केली आहे. मूर्तिकार अरुण दत्ते यांनी ही मूर्ती घडवली आहे.

वाहतुकीचा खोळंबा

परळच्या कार्यशाळेबाहेर देवी पाहायला झालेल्या गर्दीमुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता. रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका, सार्वजनिक बसची वाहतूक आणि इतर वाहने यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र, त्याच गर्दीतून रुग्णवाहिकेला वाट करून देण्यात तरुणांनी पुढाकार घेतला.

मुंबईत साकारली नांदेडच्या देवीची मूर्ती

भायखळ्याच्या बकरी अड्डा येथे गेल्या अनेक वर्षांपासून रेश्मा खातू यांचा कारखाना आहे. याही वर्षी त्यांच्या कारागिर आणि मूर्तिकारांनी नांदेडच्या देवीची अष्टभूजा अवतारातली मूर्ती साकारली आहे. या देवीला घागरा-चोळी घालून सजवले जाते. १२ ऑक्‍टोबरला ही देवी नांदेडसाठी मार्गस्थ होईल. खातू यांनी एकूण तीन मोठ्या देवीच्या मूर्ती यंदा साकारल्या आहेत. तिन्ही १२ फुटांच्या मुर्ती असून मुंबईतील चुनाभट्टी आणि वाकोला येथील देवी आहेत. मूर्ती देण्याची प्रक्रिया १४ तारखेपर्यंत सुरू होईल, असे मूर्तिकार रेश्मा खातू यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

Pune News : खासगी ट्रॅव्हल्स बसेसना पुणे शहरात नवे नियम लागू, नवीन मार्गांची अंमलबजावणी सुरू

SCROLL FOR NEXT