मुंबई

५ ते ७ मीटर उंचीच्या लाटा, ०.५ दृश्यमानता, भारतीय नौदलाचा वादळाशी बेधडक सामना

दीनानाथ परब

मुंबई: भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळच्या समुद्रात नौदलाची एक मोठी बचाव मोहिम सुरु आहे. 'स्वत:चा जीव वाचवतानाच आम्हाला इतरांचे जीव वाचवायचे आहेत' हे भारतीय नौदल अधिकाऱ्याचे (Indian Navy) शब्दच सर्वकाही सांगून जातात. समुद्रात किती धोकादायक स्थिती असेल, ते चित्र स्पष्ट होते. तौक्ते चक्रीवादळाच्या (Cyclone Tauktae) तडाख्यात सापडलेल्या, अरबी समुद्रातील (arbain sea) जहाजं आणि तेल विहीरीवरील कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी बचाव मोहिम सुरु आहे. (Indian Navy In Eye Of Cyclone Tauktae)

भारताचे नौसैनिक आपले जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवत आहेत. अजूनही ही बचाव मोहिम संपलेली नाही. P-305 जहाज बुडालं असून या जहाजावरील १८५ लोकांची सुटका केली. सोमवारी संध्याकाळी तौक्ते वादळामुळे खवळलेल्या समुद्रात P-305 आणि गाल कनस्ट्रक्टर ही जहाजं बुडाली. या दोन जहाजांवर मिळून ४१० कर्मचारी होते. P-305 जहाजात पाणी शिरल्याची माहिती मिळाल्यानंतर, भारतीय नौदलाच्या युद्धनौका तडक खवळलेल्या समुद्रात बचाव मोहिमेसाठी निघाल्या. 'आम्ही कशाचीही पर्वा केली नाही, आमची जहाजं तडक निघाली' असे कमांडर एमके झा यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं.

"नौदलाची जहाज समुद्रात निघाली, त्यावेळी लाटांची उंची ५ ते ७ मीटर होती. वाऱ्याचा ताशी वेग १०० ते १२० किलोमीटर होता. त्याचवेळी मुसळधार पाऊसही सुरु होता. दृश्यमानता अत्यंत नगण्य होती. खवळलेल्या समुद्रात अनेक आव्हानं होती" असे कमांडर झा म्हणाले.

युद्धनौकांवरुन हेलिकॉप्टर ऑपरेशन करणे, त्यावेळी शक्य नव्हते. अखेर काही तासांनी गाल कंस्ट्रक्टर जहाजावरुन १३७ लोकांची सुटका करण्यात आली. नौदलाने P-305 जहाजावरील १८५ लोकांची सुटका केली. पण अजूनही काही जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. नौदलाला आतापर्यंत १४ मृतदेह हाती लागले असून ते सर्व मृतदेह मुंबई डॉकयार्डमध्ये आणण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

Manifesto : केवळ घोषणा, अंमलबजावणी नाही! जाहीरनाम्यांपासून ज्येष्ठ नागरिक दूरच असल्याची खंत

MPSC Exam : लोकसेवा आयोगाचं शुद्धीपत्रक, राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Vimannagar Fire : विमाननगर येथे व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला आग

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

SCROLL FOR NEXT