nawab malik arrest
nawab malik arrest 
मुंबई

Nawab Malik | ८ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना ED कडून अटक

ओमकार वाबळे

ED raided on Nawab Malik House : अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सलग आठ तासांच्या चौकशीनंतर मलिक यांना अखेर अटक करण्यात आली आहे. मलिक यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालयाने छापे टाकले. त्यानंतर सकाळपासून त्यांची चौकशी सुरू होती. (Nawab Malik ED Enquiry News)

एकूण चार मालमत्तांची चौकशी सकाळपासून सुरू होती. मलिक यांच्या कुटुंबीयांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची पडताळणी ईडीकडून सुरू होती. छोटा शकील आणि हसीना पारकर जिवंत असताना त्यांच्या निगडीत काही व्यवहार झाले होते.

ईडीला यासंदर्भात संशय होता. अखेर ईडीने मलिकांना अटक केली आहे. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असून चोवीस तासात कोर्टात हजर करण्यात येणार आहे. यावेळी ईडीकडून मलिकांची रिमांड घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती मिळत आहे. (Nawab Malik Arrested by ED)

नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी सुरु होती. ईडीने सकाळी साडे सहा वाजता त्यांच्या घरी छापा टाकला होता. त्यानंतर ईडीच्या कार्यलयात तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. कारवाई झाल्यानंतर त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांकडून मेडिकल टेस्टसाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले आहे. लवकरच ईडीमार्फत त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

ED कार्यालयाबाहेर हालचालींना वेग आला आहे. आता त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी मलिकांना जे जे रुग्णालयात नेण्याची शक्यता आहे. रुग्णालयातून मलिकांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. मलिक यांच्या अटकेने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीतील दुसरा बडा नेता ईडीच्या कोठडीत सध्या आहे.

ईडीच्या गाडीत बसताना मलिकांनी 'लडेंगे और जितेंगे', असं म्हटलं. मोठ्या सुरक्षेमुळे मलिकांपर्यंत पत्रकारांना पोहोचता आलं नाही. मात्र, ईडीच्या चौकशीतून सुटल्यानंतर मलिकांनी पहिल्यांना माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

नवाब मलिक यांच्या घरी सकाळी साडे सहा वाजता ईडीचे अधिकारी धडकले. अंडरवर्ल्डशी संबंध असण्याची शक्यता असल्याने ईडीने घरात काही तपासणी केल्याची माहिती देखील मिळत आहे. याआधी अंडरवर्ल्डशी संबंधित इक्बाल कासकर तसेच अन्य काही व्यक्तींची चौकशी करण्यात आली होती. त्यांच्या खात्यात काही आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती ईडीकडे असल्याचं समोर आलं आहे. दाऊद इब्राहिमशी संबंधित काही व्यक्ती आणि खात्यांमधून मलिक यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे संबंध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

१९९३ च्या बाँम्बस्फोटातील एका आरोपीची जमीन मलिकांनी विकत घेतली होती. यासंदर्भात काही आर्थिक व्यवहारांची उकल ईडीकडून केली जात असल्याचं समोर आलंय. (ED Raids on Nawab Malik house)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RR vs PBKS Live Score: संजू सॅमसनने जिंकला टॉस! राजस्थान-पंजाबने प्लेइंग-11 मध्ये केले मोठे बदल

Kalyan Loksabha election 2024 : कल्याणच्या सभेत मोदींनी उपस्थित केला सावरकरांचा मुद्दा; राहुल गांधींना दिलं 'हे' चॅलेंज...

Nashik Fraud Crime : दिले 5 लाख, उकळले 18 लाख! अवैध सावकारीचा आणखी एक गुन्हा दाखल

Rohit Sharma: 'मी जेव्हा भारतीय संघाचा कर्णधार झालो, तेव्हा...', रोहितनं नेतृत्व अन् निवृत्तीवर केलं मोठं भाष्य

PM Modi : ''...त्या बैठकीला मी हजर होतो, मनमोहन सिंहांना मी विरोध केला होता'', मोदी नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT