NCP leader Nawab Malik addressing the media while making a strong statement on the Mumbai Mayor post and criticizing the BJP’s political strategy.

 

esakal

मुंबई

Nawab Malik Statement :नवाब मलिकांचं मुंबई महापौर पदाबाबत मोठं विधान अन् भाजपवरही साधला निशाणा, म्हणाले...

Nawab Malik Statement on Mumbai Mayor Post : जाणून घ्या, तीन वर्षानंतर पत्रकारपरिषदेत बोलताना नवाब मलिक नेमकं काय म्हणाले आहेत?

Mayur Ratnaparkhe

NCP Nawab Malik Press on BMC Election : राज्यभरात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच पक्षांनी बंडखोरी शमवण्यासाठी जोर लावल्याचे दिसून आले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्यानंतर राज्यभरातील महापालिका निवडणुकीच्या रिंगणात एकूण किती उमदेवार आहेत, हे स्पष्ट झाले आहे. शिवाय, आता त्यानुसार राजकीय पक्षांनी पुढील रणनितीवरही काम सुरू केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मुंबई महापौर पदाबाबत मोठं विधान केल्याचं समोर आलं आहे.

जवळपास तीन वर्षानंतर पत्रकारपरिषदेत बोलताना नवाब मलिक यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवरही निशाणा साधल्याचे दिसून आले. शिवाय, त्यांनी असाही दावा केला की, मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महापौर असेल आणि आमच्या पाठिंब्याशिवाय मुंबईचा महापौर निवडला जाणार नाही.

यावेळी नवाब मलिक म्हणाले की, तीन वर्षानंतर आज माध्यमांशी बोलत आहे. ही पत्रकारपरिषद मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतली जात आहे. आम्ही मुंबईत ९४ जागांवर निवडणूक लढवत आहोत. एका जागेवर उमेदवाराचे नाव रद्द झाले आहे. आमच्या उमेदवारांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे आणि सर्व प्रवर्गातील लोक आहेत. आम्ही सर्व धर्माच्या लोकांना उमेदवार बनवलं आहे, मुस्लिम, ख्रिश्चन सर्वांना तिकीट दिलं आहे. काही लोक उत्तर भारतीयांना आपली व्होट बँक समजतात, परंतु आमच्या पक्षाने सर्व भाषिक उमेदवारांना तिकीट दिलं आहे.

याशिवाय नवाब मलिक म्हणाले की, असं बोललं जात आहे की मुंबईत आम्ही १४ जागांच्या वर जाणार नाही, परंतु यावेळी मुंबईत चित्र वेगळं असेल. काही लोकांनी म्हटलं  की नवाब मलिक असतील तर आम्ही राहणार नाही. परंतु अजितदादांनी सांगितलं की तुमच्या युतीची आवश्यकता नाही. तर नामोल्लेख न करता नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटल की, जे माझं नाव घेऊन बोलत होते, अजितदादांनी सांगितलं की त्यांच्या आघाडीची आवश्यकता नाही. जी लोकं बोलताय, त्यांच्या भागात आम्ही निवडून येऊ.

Pune Political : उमेदवारी नाकारताच राष्ट्रवादी शरद पवार पक्षात खदखद; पुण्यात बैठकीत इच्छुकांचा गोंधळ!

Vasai Virar Election : वसई–विरार महापालिका निवडणुकीत माघारींचा धडाका; २८६ उमेदवार बाहेर; ५४७ रिंगणात!

Tamhini Ghat Accident: 'त्याच' थारवर जाऊन कार कोसळली; ताम्हिणी घाटात पुन्हा तसाच अपघात, एकाचा मृत्यू

Paithan Political : उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात; पैठणच्या राजकारणात उत्सुकता ताणली!

Ranjangaon MIDC Scam : रांजणगाव एमआयडीसीत नोकरीचे आमिष; ४७ तरुण-तरुणींची सत्तर हजारांची फसवणूक; दोघांना अटक!

SCROLL FOR NEXT