मुंबई

नवाब मलिक यांचा सरकारला घरचा आहेर, गृहमंत्र्यांना दिला सल्ला

पूजा विचारे

मुंबई:  राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. सामनाचा आजच्या रोखठोक सदरावर नवाब मलिक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. डॅमेज कंट्रोलसाठी खरंच मला सुरूवातीचे ४८ तास माहिती मिळाली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या रोखठोक सदरात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सचिन वाझे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनामाच्या चर्चांवर भाष्य केलं आहे.

नवाब मलिक म्हणाले की, डॅमेज कंट्रोल साठी खरच मला सुरूवातीचे ४८ तास माहिती मिळाली नाही. जेव्हा मला माहिती पाठवण्यात आली त्यानंतर मी गृहमंत्र्यांन संदर्भात माहिती माध्यमांसमोर दिली. 

यावेळी नवाब मलिक यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सल्लाही दिला आहे. गृहमंत्र्यांनी जेव्हा आपल्यावर टीका होईल तेव्हा त्या टीकेतून शिकलं पाहिजे. अशा टीकेला उत्तर न देता त्यातून आपण शिकलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे, असा सल्ला नवाब मलिक यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिला आहे. 

काय म्हटलं आहे रोखठोक सदरात?

देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्विकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा आणि रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळय़ात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलिस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो. अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’ असे वर्तन गृहमंत्र्यांचे असायला हवे. पोलिस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो हे विसरून कसे चालेल?. 

परमबीर सिंग यांनी आरोप केले तेव्हा गृह खात्याचे आणि सरकारचे वाभाडे निघाले, पण महाराष्ट्र सरकारचा बचाव करायला एकही महत्त्वाचा मंत्री तत्काळ पुढे आला नाही. चोवीस तास गोंधळाचेच वातावरण निर्माण झाले. लोकांना परमबीर यांचे आरोप सुरुवातीला खरे वाटले याचे कारण सरकारकडे ‘डॅमेज कंट्रोल’ची कोणतीही यंत्रणा नाही. एका वसुलीबाज फौजदाराचा बचाव सुरुवातीला विधिमंडळात केला. त्यानंतर परमबीर सिंग यांच्या आरोपांना कुणी उत्तर द्यायला तयार नव्हते व मीडियाचा ताबा काही काळासाठी विरोधी पक्षनेत्यांनी घेतला हे चित्र भयंकर होते.

Nawab Malik reaction on Saamana rokhthok and Advice Anil Deshmukh

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT