Agitation After Nawab Malik ED Custody e sakal
मुंबई

'राष्ट्रवादी कि जडें...' अटकेनंतर नवाब मलिकांचा करारा जवाब

सकाळ डिजिटल टीम

ED raided on Nawab Malik House : अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना सलग आठ तासांच्या चौकशीनंतर अखेर अटक करण्यात आली. मलिक यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालयाने छापे टाकले. त्यानंतर कोर्टात युक्तीवाद झाला. यावेळी त्यांनी ३ मार्पर्यंत ईडीची कोठडी देण्यात आली आहे. (Nawab Malik ED Enquiry News)

मलिक यांच्या कुटुंबीयांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची पडताळणी ईडीकडून सुरू आहे. छोटा शकील आणि हसीना पारकर जिवंत असताना त्यांच्या निगडीत काही व्यवहार झाले होते. यासंदर्भात ईडीकडून चौकशी सुरू आहे.

दरम्यान नवाब मलिक यांची प्रकृती खालवल्याने त्यांना जे.जे. रुग्णालयात जास्त वेळ ठेवण्यात आलं होतं. यानंतर मलिकांनी ट्वीट करत अभिनेता मनोज बाजपेयीचा व्हिडीओ शेअर केला आहे. (Nawab Malik Arrested by ED)

मलिकांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना तासाभरात पुन्हा ईडीच्या कोठडीत नेणं अपेक्षित होतं. मात्र, चार तास झाल्यानंतरही त्यांच्या उर्वरित चाचण्या सुरू होत्या. रुग्णालयात त्यांच्या उर्वरित चाचण्या सुरू असून उपचारही पार पडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात ईपीआर जवळच्या पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलाय.

यापूर्वीच न्यायालयाने नवाब मलिक यांना ईडीच्या कोठडीत घरचे जेवण मिळण्याची परवानगी दिली होती. तसेच औषधे उपलब्ध करुन देण्यासही परवानगी दिली होती. आता ३ मार्चपर्यंत मलिकांना ईडीच्या कोठडीत दिवस काढावे लागणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogesh Kadam Reaction : “छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलतो असं नाही” ; मंत्री योगेश कदमांचं विरोधकांना प्रत्युत्तर!

Akhilesh Yadav Facebook Account Ban : सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे फेसबुक अकाउंट बंद; तांत्रिक चूक की आणखी काही?

गुंड निलेश घायवळ प्रकरणात मोठी बातमी! जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराची ४० प्रकरणे समोर, तपास सुरू

Duplicate Currency : कोल्हापूरात बनावट नोटा बनवणारी टोळी उघडकीस; एक कोटी ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, टोळीचा मास्टर माईंड कोल्हापूर पोलिस दलातील कर्मचारी

Jaykumar Gore : बार्शीच्या राऊतांचा पराभव एक अपघात होता; तालुक्याच्या विकासाचा वेग खंडित झाला

SCROLL FOR NEXT