Nawab Malik Ajit Pawar  eSakal
मुंबई

Nawab Malik: भाजपच्या विरोधाला केराची टोपली! नवाब मलिकांनाच उमेदवारी मिळणार? अजित पवार गटाकडून स्पष्ट संकेत

Nawab Malik Ajit Pawar Group: अनुशक्ती नगर नवाब मलिक यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी नवाब मलिक यांनी तयारी सुरु केल्याची माहिती आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- आमदार नवाब मलिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षीय बैठकांना हजेरी लावायला सुरुवात केली होती. आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेचे मुंबईत स्वागत देखील करणार आहेत. या मतदारसंघातून पुन्हा विधानसभेची निवडणूक लढण्यास नवाब मलिक इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे.

22 ऑगस्टला मुंबईतील अनुशक्ती नगर, मानखुर्द शिवाजीनगर या ठिकाणी अजित पवारांची जनसन्मान यात्रा होणार आहे. याचे स्वागत नवाब मलिक आणि त्यांचे कार्यकर्ते करणार आहेत. अनुशक्ती नगर नवाब मलिक यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी नवाब मलिक यांनी तयारी सुरु केल्याची माहिती आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, यंदा नवाब मलिक यांच्या कुटुंबातून दोघेजण विधानसभेच्या जागा लढल्या जाण्याची दाट शक्यता आहे. अनुशक्ती नगर शिवाजी नगर मानखुर्द या भागात अजित पवार यांच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभेला नवाब मलिक यांना उमेदवारी देण्याच्या दृष्टीकोनातूनच या यात्रेकडे पाहिलं जात आहे.

भाजपचा असणार विरोध

नबाल मलिक यांना महायुतीमध्ये घेण्यास भाजपचा विरोध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला नवाब मलिक यांनी उपस्थिती लावली होती. यावरून भाजपने आक्षेप घेतला होता. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी तर अजित पवार यांना थेट पत्र लिहिलं होतं. यात देशद्रोहाचे आरोप असलेल्या नेत्याला महायुतीमध्ये घेण्यात येऊ नये असा उल्लेख पत्रात करण्यात आला होता.

अजित पवार यांच्याकडून नवाब मलिक यांना दूर करण्यात आलेलं नाही. विधानभवनामध्ये देखील नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसले होते, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला देखील हजेरी लावली होती. त्यामुळे भाजपचा विरोध असून देखील अजित पवार गट नवाब मलिकांना जवळ करत असल्याचं दिसत आहे. उद्या त्यांना विधानसभेचं तिकीट देखील दिलं जाऊ शकतं. यासंदर्भात पुढे काय घडामोडी घडतात हे पाहावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT