drugs.jpg 
मुंबई

NCB ची मोठी कारवाई, मुंबईला ड्रग्ज पुरवणाऱ्या एका मोठ्या तस्कराला अटक

सकाळ डिजिटल टीम

सध्या मुंबईत अमली पदार्थ विरोधी पथकाकडून ड्रग्ज तस्करांविरोधात मोठी मोहिम सुरु आहे. काल रात्री NCB ने मुंबईला ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या एका मोठ्या तस्कराला अटक केली. शादाब बटाटा असे या आरोपीचे नाव आहे. एनसीबीने काल मध्यरात्री तीन ठिकाणी छापेमारीची कारवाई केली. अंधेरी लोखंडवाला आणि मिरारोड येथे छापेमारीची ही कारवाई करण्यात आली. NCB ने कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले असून बाजारात त्याची किंमत दोन कोटी इतकी असल्याची माहिती सूञांनी दिली आहे

कारवाईसाठी गेलेल्या NCB अधिकाऱ्यांच्या अंगावर आरोपीने सोडले श्वान
दोन दिवसांपूर्वी एनसीबीनं वांद्रे परिसरात छापेमारी केली. या छापेमारीत एनसीबीनं एका १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याला अटक केली आहे. या आरोपीकडून २ लाखांचे ड्रग्ज आणि २.३० लाख रोकडही जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी असलेला विद्यार्थ्यावर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी ना तो ड्रग्ज पुरवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. न्यायालयानं त्याला ४ दिवसांची NCB कस्टडी दिली आहे. आरोपीनं कम्प्यूटरच्या CPU मध्ये ड्रग्ज लपवून ठेवले होते. मुंबईच्या वांद्रे, खार आणि अंधेरी या भागांमध्ये तो अंमली पदार्थांचा पुरवठा करायचा.  

मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीची टीम रात्री उशिरा वांद्रे  याठिकाणी पोहोचली. अयान सिन्हा असं आरोपीचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीनं आपल्या घरामध्ये दोन कुत्रे पाळले होते. एनसीबीची टीम कारवाई करण्यासाठी घरात शिरताच त्यानं ते कुत्रे एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर सोडले. मात्र तरीही अधिकाऱ्यांनी आपल्या कारवाईत कुठेच खंड पडून दिला नाही. त्यांनी आपली कारवाई सुरुच ठेवली. 

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आरोपीकडून मोबाईल फोन, कम्प्यूटर, इलेक्ट्रॉनिक गॅजेट आणि ड्रग्ज मोजण्याची मशीन जप्त केली आहे. आरोपी ड्रग्ज विकण्यासाठी फेक फेसबुक अकाऊंटचा वापर करत होता. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला चार दिवस पोलिस कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT