shah rukh khan 
मुंबई

Drugs Case: शाहरुखच्या 'मन्नत'वर NCBची टीम

क्रुझवरील आर्यन खानच्या ड्रग्ज पार्टीप्रकरणी चौकशी

स्वाती वेमूल

अभिनेता शाहरुख खानच्या वांद्रे इथल्या 'मन्नत' बंगल्यावर केंद्रीय अमलीपदार्थ विरोधी पथकाची (NCB) टीम पोहोचली. एनसीबीची एक टीम शाहरुखच्या बंगल्यावर होती तर दुसऱ्या टीमने अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी धाड टाकली. जवळपास तीस मिनिटांनंतर ही टीम शाहरुखच्या घरातून निघाली. यावेळी अधिकाऱ्यांच्या हातात काही कागदपत्रे होती. आर्यनची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी आज (गुरुवारी) संपत आहे. त्यापूर्वी एनसीबीने आक्रमक भूमिका घेतली आहे. आर्यनच्या जामिनाला तीव्र विरोध करण्यासाठी एनसीबीचं हे पाऊल महत्त्वाचं ठरणार आहे.

शाहरुखने आजच (गुरुवारी) आर्थर रोड कारागृहात आर्यनची भेट घेतली. क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटकेत असलेल्या आर्यनचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने बुधवारी फेटाळला. त्यानंतर आर्यनच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

न्यायालयाने आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅटिंगचा दाखला दिला. आर्यन आणि अन्य दोन आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग सकृतदर्शनी गंभीर आहे. त्यामुळे जामिनावर असताना तो अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा करणार नाही हे म्हणता येऊ शकत नाही, शिवाय एनसीबीने प्रकरणाशी संबंधित सादर केलेली कागदपत्रे आणि आर्यन, अरबाज यांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर स्वेच्छेने दिलेल्या जबाबानुसार त्यांनी सेवनासाठी ड्रग्ज बाळगल्याचं कबूल केलं होतं. यावरून अरबाजच्या बुटातून हस्तगत केलेल्या ड्रग्जबाबत त्याला माहिती होती हेच स्पष्ट होतं. या बाबी लक्षात घेता आरोपींना जामीन देता य़ेणार नसल्याचं न्यायालयाने म्हटलं. विशेष न्यायालयाच्या निर्णयानंतर आर्यनच्या वकिलांनी त्याच्या जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. आर्यनच्या जामिनावर उच्च न्यायालयात २६ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT