drugs sakal media
मुंबई

NCB : आफ्रिकन नागरिकाच्या पोटात सापडले सात कोटींचे ड्रग्स

अनिष पाटील

मुंबई : अंमली पदार्थ तस्कर (drug peddler) असल्याच्या संशयावरून केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) ताब्यात घेतलेल्या परदेशी नागरीकाच्या (foreigner) पोटातून सुमारे 70 कॅप्सूल (capsules drug) बाहेर काढण्यात आल्या आहेत. या अंमली पदार्थाची किंमत सात कोटी रुपये आहे.

तो आफ्रिकी देशाचा नागरीक आहे. रविवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्याला ताब्यात घेण्यात आले होते. कतार एअरलाईन्सने तो मुंबईत आला होता. त्याच्या पोटात कोकेन असल्याचा संशय अधिकाऱ्यांना होता. त्यामुळे त्याची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी परवानगी न्यायालयाकडे मागण्यात आली होती. त्यानुसार जे.जे. रुग्णालयात त्याचा एक्‍सरे व सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या पोटात संशयीत कॅप्सूल असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर डॉक्‍टरांनी त्याच्या पोटातून या 70 कॅप्सूल काढल्या. त्यात कोकेन अथवा हिरोईन असल्याचा संशय आहे.

जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाचे वजन दीड किलो असून त्याची किंमत सात कोटी रुपये आहे. चौकशीत त्याल एका व्यक्तीने हे अंमली पदार्थ दिले होते. ते मुंबईत वाहून आणण्यासाठी काही रक्कम देण्याचे कबुल केले होते. त्याची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे त्याने हे काम करण्यास होकार दिला. आरोपी स्वतःला व्यवसाईक असल्याचे भासवत होता. त्याचा तिकीटखर्चही परदेशातील आरोपीने केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pusad Gun Firing : पुसद मध्ये गोळीबार, चाकूहल्ल्यात दोघे जखमी; घटनेने खळबळ

FIFA सामन्यात दिसलेलं 'ग्रीन व्हिसल' नेमकं आहे तरी काय? Pain कमी करणाऱ्या या उपकरणाची जगभर होतेय चर्चा!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Khadakwasala Dam : धरण क्षेत्रात यंदा पावसाची मोठी तफावत; सरासरी ९५.८४ टक्के घट, पाणीसाठ्याबाबत चिंता

Land Acquisition : माऊलींच्या पालखीसाठी अवघ्या तीन महिन्यात भूसंपादन; इमारत पाडण्याचे काम सुरू

SCROLL FOR NEXT