gold crime sakal media
मुंबई

सोन्याच्या तस्करीप्रकरणी केनियाच्या तीन महिलांना अटक ; ९३७ ग्रॅम सोने जप्त

अनिष पाटील

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (international airport) तीन केनिया देशाच्या महिलांना (kenya woman arrest) अटक केली आहे. त्यांच्याकडून 937.78 ग्रॅम सोने जप्त (gold seized) केले आहे. त्यांनी या सोन्याची पाकिटे गुप्तांगात लपवल्याची माहिती एनसीबीकडून देण्यात आली.

खुरेशा अली(61), अब्दुल्लाहीअब्दीया अदान(43) व अली सादीया अलो(45) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. तीन परदेशी महिला अमली पदार्थासह छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार एनसीबीने बुधवारी विमानकळावर सापळा लावून तीन केनियन महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्या शरीराच्या स्कॅनिंगमध्ये त्यांनी त्यांच्या गुप्त अंगात सोने लपवल्याचे उघड झाले. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडील 937.78 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून हे प्रकरण पुढील कारवाईसाठी सीमाशुल्क विभागाकडे सोपवण्यात आले आहे. महिलांकडून 13 पाकीटे जप्त करण्यात आली आहेत. त्यात प्रत्येकी 20 ग्रॅम ते 100 ग्रॅम सोने होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील वातावरण तापलं! इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT