मुंबई

समीर वानखेडेंचा सत्कार, NCB ऑफिसमध्ये येताना उधळली फुलं

शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेने सत्कार केला.

सकाळ वृत्तसेवा

- सुशांत सावंत

मुंबई: वेगवेगळ्या आरोपांमुळे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मुंबई NCB चे झोनल संचालक समीर वानखेडे (Sameer wankhede) यांच्या समर्थनार्थ काही संघटना समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक (Nawab malik) दररोज पत्रकार परिषदा घेऊन समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. त्यांचं व्यक्तीगत आयुष्य, जात, धर्म यावर मलिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

आज शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेचे कार्यकर्ते समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ एनसीबी कार्यालयाबाहेर जमले होते. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करुन समीर वानखेडे यांना पाठिंबा दिला. नवाब मलिक यांचा निषेध केला. समीर वानखेडे आपल्या कार्यालयात जात असताना शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी त्यांना गाठलं व सत्कार केला. त्यांच्यावर फुले उधळण्यात आली. यावेळी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.

"समीर वीनखेडे यांनी केलेली कारवाई योग्य आहे. त्यांच्यावर राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही नवाब मलिक यांचा निषेध करतो. युवा पिढीला ड्रग्जपासून वाचवण्यासाठी एक अधिकारी प्रामाणिकपणे काम करतोय. त्याला साथ दिली पाहिजे, समीर वानखेडे तुम्ही आरोपांकडे दुर्लक्ष करा. ड्रग्ज रॅकेटचा पदार्फाश करा. आम्ही तुमच्यासोबत आहोत" असं शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या पदाधिकाऱ्याने सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT