Drug ANI
मुंबई

मुंबईत 40 लाखांचे ड्रग NCBकडून जप्त; दोघांना अटक

त्यांच्याकडून 7 हजार 200 कोडीनयुक्त कफ सिरपच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अंमली पदार्थ विरोधी पथकाने आज मुंबईत 2 आरोपींना अंमली पदार्थाची तस्करी करताना अटक केली आहे. त्यांच्याकडून 7 हजार 200 कोडीनयुक्त कफ सिरपच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. अंमली पदार्थाची वाहतूक करणार आणि स्विकारणाऱ्या दोघा आरोपींना अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.

(NCB Raid 2 Arrest In Mumbai)

जप्त करण्यात आलेल्या 7 हजार 200 बाटल्या भिवंडी परिसरात देण्यात येणार होत्या. तेथून त्या मुंबईतील विविध भागात पोहोचवल्या जाणार होत्या. असं आरोपींनी चौकशीत सांगितलं आहे. दरम्यान आरोपींची अधिक चौकशी करण्यात येत आहे. वाहतूक करण्यात येत असलेल्या अंमली पदार्थाची किंमत ही अंदाजे 40 लाख रूपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येत असून मुंबई आणि ठाण्यात कोडीनयुक्त कफ सिरप (CBCS) च्या बेकायदेशीर पुरवठा करणाऱ्या आरोपींचे संबंध शोधण्यासाठी पोलिस त्यांची कोठडी घेणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तीन वेळा डेडलाईन… तरीही योजना कागदावरच का? 'झिरो प्रिस्क्रिप्शन’चा अर्थसंकल्पात स्पष्ट उल्लेख नाही!

Google Search : फेब्रुवारी महिन्यात सगळ्यात जास्त बघण्यात आले 'हे' 5 व्हिडिओ, गुगल सर्च ट्रेंड डेटामुळे जगभर खळबळ

Mhada: रहिवाशांना गुडन्यूज! घरं रिकामी करण्यासाठी शिप्टींन चार्जेस देणार, आर्थिक मदतीसाठी म्हाडाचा मोठा निर्णय

EKA Mobility : इलेक्ट्रिक वाहन निर्मिती, स्त्रीसन्मान अन् तरुणांना रोजगार; EKA Mobility चा तिहेरी विजय! वाचा सविस्तर यशोगाथा

Latest Marathi News Live Update : रे रोड येथे हत्येचा प्रयत्न; क्रेन ऑपरेटरवर लोखंडी रॉडने हल्ला

SCROLL FOR NEXT