Bhagat singh koshyari sakal media
मुंबई

लोढा यांची राज्यपालांकडे धाव; मलिक यांच्याविरुद्ध तक्रार

वानखेडे प्रकरणी भाजपची आक्रमक भूमिका

कृष्ण जोशी

मुंबई : एनसीबीचे (NCB) वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्याविरुद्ध रोज बेफाट आरोप करणारे व त्यांना धमक्या देणारे मंत्री नबाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी आज भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा (Mangal prabhat lodha) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh koshyari) यांची भेट घेतली.

नबाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीने अमली पदार्थांच्या व्यापारप्रकरणी अटक केली आहे. त्यामुळे चिडून मलिक यांनी वानखेडे यांच्यावर पुराव्याशिवाय बेलगाम आरोप करण्याचा सपाटा लावल्याचाही आरोप भाजपतर्फे करण्यात आला. याप्रकरणी आता भाजपने आक्रमक भूमिका घेतल्याचे आज स्पष्ट झाले. सरकारी अधिकाऱ्यांना धमक्या देण्याची मलिक यांना इच्छा असेल तर त्यांनी सर्वप्रथम आपल्या मंत्रीपदाचा राजिनामा द्यावा, असेही लोढा यांनी सांगितले.

मलिक सरकारी अधिकाऱ्यांना धमक्या देत असून ही महाराष्ट्राच्या राजकारणाला काळीमा फासणारी गोष्ट आहे. यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणीही राज्यपालांकडे करण्यात आली. मलिक यांचे आरोपांचे सत्र त्वरित थांबले नाही तर यासंदर्भात आम्ही राष्ट्रपती व केंद्रीय गृहमंत्री यांची भेट घेऊ. तसेच वेळ पडलीच तर आम्ही याविरुद्ध न्यायालयातही जाऊ, असा इशाराही लोढा यांनी दिला.

राज्य सरकारमधील महत्वाचे मंत्रीच कायदा धाब्यावर बसवून उघडपणे वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना रोजच्या रोज धमक्या देत आहेत. त्यांच्यावर वाटेल ते खोटे आरोप करीत आहेत. मलिक आपल्या पदाचा दुरुपयोग करीत असून ते योग्य नाही. ही बाब महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच होत आहे. त्यामुळे राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती असल्याने राज्यपालांनी हस्तक्षेप करावा. सरकारी अधिकाऱ्यांना धमक्या देणाऱ्यांना शिक्षा द्यावी, अशी मागणीही आपण राज्यपालांकडे केल्याचे लोढा यांनी नंतर प्रसारमाध्यमांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT