sameer wankhede 
मुंबई

Drug case: राष्ट्रवादीने केलेले आरोप NCB ने फेटाळले

गोस्वामी आणि मनीष भानुशाली हे भाजपाशी संबंधित असलेले दोन व्यक्ती एनसीबीच्या कारवाईत कसे सहभागी झाले, या बद्दल थेट उत्तर देण्याचे टाळले

सुरज सावंत

मुंबई: NCB ने शनिवारी मुंबई जवळ क्रूझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर (Rave party) कारवाई केली. त्यांनी पार्टीमधून सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan khan) अटक केली. या प्रकरणी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab malik) यांनी पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक आरोप केले आहेत. भाजपाशी संबंधित असलेला मनीष भानुशाली हा व्यक्ती एनसीबी सोबत कारवाईमध्ये सहभागी झाला होता. भाजपशी संबंधित असलेला व्यक्ती NCB सोबत कसा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. छापेमारीच्या या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसने गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

त्यावर आता एनसीबीचे झोनल संचालक समीर वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली. विशेष टीप मिळाली होती. त्या आधारावर एनसीबी मुंबई टीमने क्रूझवर छापा मारला. आठ जणांना ताब्यात घेतलं. अरबाज मर्चंट, आर्यन खान, मुनमुन धमेचा यांना विविध ड्रग्ज सोबत ताब्यात घेण्यात आलं. मोहक जयस्वालच्या माहितीनंतर जोगेश्वरीतून अब्दुल शेखला ताब्यात घेतलं, अशी माहिती आज एनसीबीने पत्रकार परिषदेत दिली. एकूणच अटक आणि कारवाईच्या सर्व घटनाक्रमाची माहिती एनसीबीने दिली.

पण गोस्वामी आणि मनीष भानुशाली हे भाजपाशी संबंधित असलेले दोन व्यक्ती एनसीबीच्या कारवाईत कसे सहभागी झाले, या बद्दल थेट उत्तर देण्याचे टाळले. पंचनाम्याचे साक्षीदार म्हणून दोघेही तिथे होते. कायद्यात तशी तरतूद आहे, असे एनसीबीकडून सांगण्यात आले. आमच्यावर करण्यात आलेल आरोप निराधार आहेत. सर्व प्रक्रियाचे पालन करुन कारवाई केली आहे, असे एनसीबीने आज पत्रकार परिषदेत सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Boisar MIDC Fire: बोईसर एमआयडीसीमध्ये मोठा स्फोट, अनेक कामगार जखमी झाल्याची भीती; Video Viral

Pune Police Misconduct : रक्षकच बनला भक्षक! पुण्यात पोलीस ठाण्यातच महिला कर्मचाऱ्यासोबत अश्लील चाळे; हवालदार निलंबित

Nag Panchami 2026: वारंवार घरात साप दिसणे शुभ की अशुभ? कालसर्प दोषापासून शांतीसाठी करा ‘हे’ उपाय

Marathi News Live Updates : ठाकरे सेनेचा नाशिकमध्ये जनआक्रोश मोर्चा; संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक रस्त्यावर

Prithviraj Chavan: कऱ्हाड दक्षिणच्या मतदार यादीत ५६ हजार संशयित दुबार नोंदी कशा? पृथ्वीराज चव्हाणांनी प्रशासनाला घेरले, ‘ती’ राजकीय चूक झाली..

SCROLL FOR NEXT