पोलादपूर : मोरे महाविद्यालयातील रासेयोच्या वतीने सातदिवसीय श्रमसंस्कार शिबिर घेण्यात आले.
पोलादपूर : मोरे महाविद्यालयातील रासेयोच्या वतीने सातदिवसीय श्रमसंस्कार शिबिर घेण्यात आले.  
मुंबई

रासेयो शिबिरे म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली : ॲड. विनोद देशमुख

सकाळ वृत्तसेवा

पोलादपूर (बातमीदार) : महाविद्यालयीन विद्यार्थी सामाजिक बांधिलकी, वेळेचे महत्त्व व व्यवस्थापन, स्वावलंबन, समायोजन, सांघिक वृत्ती आणि सेवाभाव यांसारखे अनेक गुण रासेयोच्या श्रमसंस्कार शिबिरातून आत्मसात करतात. यामधूनच त्यांना व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली प्राप्त होऊ शकते, असे मत शिवाई शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. विनोद देशमुख यांनी व्यक्त केले.

सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सातदिवसीय श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप समारंभात ॲड. देशमुख बोलत होते. कापडे गावच्या सरपंच सुवर्णा सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या समारोप समारंभासाठी उपसरपंच रूपेश सकपाळ, अंकुश सकपाळ, जितेंद्र सकपाळ, ग्रामसेवक अनिल पवार आदी मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर रूणाली मोरे, नम्रता कारंडे, प्रचिती महाडिक या विद्यार्थिनींनी लक्ष्यगीत सादर केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. दीपक रावेरकर यांनी सर्वांचे स्वागत केले. 
ग्रामीण रुग्णालय, पोलादपूर व  रेड रिबन क्‍लबच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शिबिरातील ६० विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने स्वत:ची एचआयव्ही चाचणी करून घेतली. 
या समारोप कार्यक्रमात नम्रता कारंडे, महेंद्र शेलार, इर्शाद पोवेकर, अविनाश कदम, साईराज कदम, सेजल सकपाळ आदी विद्यार्थ्यांनी शिबिराच्या माध्यमातून सभाधीटपणा, श्रमाची आवड, सांघिक काम, प्रसंगावधान आदी गुणांचा विकास त्यांच्यामध्ये कशा प्रकारे झाला याबाबत आपले विचार मांडले.

प्राचार्य डॉ. रावेरकर यांनी महाविद्यालयाच्या रासेयो विभागाने दत्तक घेतलेल्या कापडे गावात ग्रंथालयासारखे विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवण्याचा मनोदय व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी स्वाती शिरापुरे हिने केले, तर सेजल सकपाळ हिने कवितेचे सादरीकरण केले. 

उपक्रमांचा धडाका
भवानवाडी, फौजदारवाडी येथे वनराई बंधारा, सार्वजनिक विहीर, स्मशानभूमी परिसर स्वच्छता, भवानवाडी ते कापडे बुद्रुक या दीड किमी रस्त्याची डागडुजी करण्‍यात आली. श्रमदानाबरोबरच विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, महिला सबलीकरण आदी पथनाट्याचे सादरीकरण, स्वच्छता व प्लास्टिक निर्मूलन जनजागृती फेरी, सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण केले.

राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या शिबिरांमधून येणारे विविध अनुभव, तसेच शिबिरांमधून समजणारे समाजाचे प्रश्न यांचा विद्यार्थ्यांना पुढील काळात त्यांच्या स्वतःच्या करिअरसाठी अत्यंत चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. 
- ॲड. विनोद देशमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला बसला दुसरा धक्का, कर्णधार केएल राहुलला हर्षित राणाने धाडलं माघारी

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT