nawab-malik.jpg 
मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस लॉकडाउनच्या विरोधात?

दीनानाथ परब

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्याचे संकेत दिले आहेत. आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कोविड टास्क फोर्ससोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रविवारी एक बैठक पार पडली. धान्य पुरवठा, औषधं, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. 

मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार असल्याची चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसने या संदर्भात एक महत्त्वाचे विधान केले आहे. "महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. काल एकादिवसात ४० हजार कोरोनाबाधितांची नोंद झाली. निश्चित रुपाने लॉकडाउन जनतेला परवडणारे नाही" असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक म्हणाले. 

"लॉकडाउन हा उपाय नसल्याचा आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला. त्याऐवजी आपण आणखी आरोग्य सुविधा निर्माण केल्या पाहिजेत" अशी राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका मांडल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. पण "सध्या ज्या पद्धतीने रुग्ण संख्या वाढतेय, त्यामुळे भविष्यात बेडची कमतरता निर्माण होऊ शकते. त्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. लॉकडाउनचा निर्णय अजून झालेला नाही. वेळ अजून हातातून गेलेली नाही. जनतेने शासनाने आखून दिलेल्या नियमांचे काटेकोरपालन करावे, तर लॉकडाउन टाळता येईल" असे नवाब मलिक म्हणाले. 

मुंबईसह राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कालपासून मुंबईमध्ये सुद्धा रात्री आठवजल्यापासून दुकाने, बार, हॉटेल्स बंद करण्यात येत आहेत. राज्यभरात रात्रीची संचारबंदी लागू झाली आहे. महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये कडकडीत लॉकडाउन पाळण्यात येत आहे. मुंबईतही रुग्ण संख्या काल सात हजारच्या जवळ पोहोचली होती. मुंबईत रुग्णसंख्या वाढत असली, तरी मृत्यूदर मात्र नियंत्रणात आहे. मुंबईत रुग्णसंख्या वाढण्यामागे चाचण्यांमध्ये झालेली वाढ हे सुद्धा एक कारण आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT