ncp Amol Mitkari Hindu priest on bjp Sheetal Gambhir Desai mumbai sakal
मुंबई

ज्येष्ठ नेत्यांचे संस्कारच मिटकरींपर्यंत पाझरले, पुरोहितांवरील टीकेबाबत भाजपाचा टोला

राष्ट्रवादीचे कनिष्ठ नेते जाहीर सभेत हिंदू पुरोहितांची टिंगल करतात आणि वरिष्ठ मंत्री व्यासपीठावरून खिदळून त्यांना उत्तेजन देतात

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रवादीचे कनिष्ठ नेते जाहीर सभेत हिंदू पुरोहितांची टिंगल करतात आणि वरिष्ठ मंत्री व्यासपीठावरून खिदळून त्यांना उत्तेजन देतात. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे संस्कारच मिटकरी यांच्यापर्यंत पाझरले आहेत, अशी टीका मुंबई भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष शीतल गंभीर देसाई यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदू पुरोहितांची टिंगल केल्याचा प्रसंग नुकताच घडला. त्या सभेत मागे बसलेले मंत्री जयंत पाटील व धनंजय मुंडे हे त्या वक्तव्यावर खिदळत असल्याचा व्हिडिओ देखील समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाला आहे. या प्रकरणामुळे राज्यात मोठा असंतोष निर्माण झाला असून मिटकरी यांच्याविरुद्ध काही ठिकाणी पोलीस तक्रारही झाली आहे. त्यासंदर्भात श्रीमती देसाई यांनी वरील टीका केली आहे.

मुळात अल्पसंख्य असल्याने ज्यांच्या मतांची फारशी गरज नाही अशा शांतताप्रिय समाजाविरुद्ध टीका करून आपण पुरोगामी व सेक्युलर आहोत असे दाखवणे, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिल्यापासूनच धोरण राहिले आहे. त्यातूनच विशिष्ट समाजातील थोर संत, इतिहासकार आदींचा राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यापासून अपमान केला आहे. पुरंदर किल्ल्याएवढी थोरवी असलेल्या एका शिवभक्त इतिहासकारावर राष्ट्रवादी काँग्रेसने लावलेली लांछने खोटी असल्याचे आता सिद्ध झाले आहे. तरीही त्यापासून काहीही धडा न घेता आता हिंदू पुरोहितांवर टीका करुन समाजात जातीय द्वेष पसरविण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस करीत असल्याचे श्रीमती देसाई यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांची धोरणेच कनिष्ठ पातळीवरचे नेते-कार्यकर्ते पुढे चालू ठेवणार हे उघड आहे. मग वरिष्ठ नेतृत्वाने राज्यातील संत-इतिहासकार यांच्यावर केलेली अप्रत्यक्ष टीका असो किंवा स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख "श्रीमंत" असा केलेला असो किंवा ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांना, वाचण्याचा मक्ता अजूनही फक्त विशिष्ट वर्गाकडे आहे असे वाटते, अशा आशयाची त्यांच्यावर केलेली टीका असो, यातूनच कनिष्ठ नेतृत्व धडा घेणार हे उघड आहे. त्यामुळे अशी बेताल बडबड करणाऱ्या कनिष्ठ नेतृत्वाला तोंड मिटण्यास पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सांगावे, असेही श्रीमती देसाई यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा हाहाकार! एकता नगरमध्ये पाणी शिरलं, खडकवासल्यातून विसर्ग वाढला

Kolhapur Rain Update : पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली, जिल्ह्यातील ४१ मार्गांवर पाणी; राधानगरी धरणाचे ५ दरवाजे बंद, असा आहे पावसाचा अंदाज?

Pune-Mumbai Train Cancelled : पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! सर्व रेल्वे गाड्या रद्द, पाहा संपूर्ण यादी

Post Office Scheme: रोज फक्त 50 रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल 35 लाखांचा फंड; काय आहे योजना?

Rain-Maharashtra Latest live news update: गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग, नाशिकमध्ये पूरस्थितीची शक्यता

SCROLL FOR NEXT