मुंबई

मुदतीत सरकार स्थापन करण्यात शिवसेना अपयशी; काँग्रेस, राष्ट्रवादीचे तळ्यात मळ्यात

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेत अत्यंत नाटकीय पद्धतीने घडामोडी घडताना पाहायला मिळतायत. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे गटनेते म्हणून सरकार स्थापन करणार का? याबद्दल  राज्यपालांकडून विचारणा करण्यात आली. शिवसेनेला 24 तासांचा अवधी देण्यात आलेला.  सरकार स्थापन करण्यास उत्सुक आहात का ? याबद्दल विचारण्यात आली.  दरम्यान, आम्हाला देण्यात आलेला वेळ हा 24 तासांचा असताना सर्व शिवसेनेच्या आमदारांचं पत्र देण्यात आलं. अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांना दिली. 

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या इतर पक्षांशी प्राथमिक चर्चा सुरु आहे आणि त्यांच्या संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यास वेळ लागणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. यासाठीच शिवसेनेकडून राज्यपालांकडे अधिकचा वेळ मागण्यात आला होता. मात्र, राज्यपालांनी वेळ वाढवून देण्यास नकार दिलाय.

दिल्लीत अजून काहीही ठरलेलं नाही :

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात अजूनही चर्चा सुरु आहे. अशात कॉंग्रेसने शिवसेनेला पाठींबा देण्याबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबत उद्या पुन्हा चर्चा होईल अशीही माहिती कॉंग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून देण्यात आली.   दरम्यान आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते असं राजकीय विश्लेषकांकडून सांगितलं जातंय. मात्र, पुढच्या काही वेळात राज्यपाल काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

Webtitle : NCP and Congress has not yet supported shivsena officially

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prateek Yadav: प्रतीक यादवच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला पल्मोनरी थ्रोम्बोएम्बोलिझम काय? डॉक्टरला बोलावण्याचीही संधी मिळाली नाही...

RCB VS KKR LIVE: अजिंक्य रहाणेने वर्ध्याच्या पोट्ट्याला दिली पदार्पणाची कॅप... जाणून घ्या कोण आहे सौरभ दुबे? ६ फूट ५ इंच उंचीचा गोलंदाज

"नजरेत धग अन् रग..."ओळखलंत का 'रंगी'ला? १९ जूनला होतंय 'घबाडकुंड'चं दर्शन!

Pune News : थकबाकी न भरल्यास पथारी व्यावसायिक काळ्या यादीत; प्रशासनाचा इशारा

Shahid Afridi चा 'Hilal-e-Imtiaz' पुरस्काराने गौरव; म्हणाला, हा पाकिस्तानसाठी शत्रूविरुद्ध लढणाऱ्या हुतात्म्यांना समर्पित... Video

SCROLL FOR NEXT