Baba Siddique 
मुंबई

Baba Siddiqui: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या! दोन जण ताब्यात

तीन ते चार तरुणांकडून गोळीबार केला असल्याची माहिती मिळते आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर अज्ञात तरुणांनी गोळीबार केला यात त्यांचा मृत्यू झाला आहे. वांद्रे पूर्व परिसरातील खेरनगर परिसरात ही घटना घडली. तीन ते चार तरुणांकडून गोळीबार केला असल्याची माहिती मिळते आहे. लिलावती रुग्णालयात त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं साम टीव्हीच्या सुत्रांनी सांगितलं आहे. NCP leader Baba Siddique Shot dead by four people two arrested

शनिवारी रात्री ९ वाजता तीन ते चार तरुणांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला आहे. दोन ते तीन राऊंड त्यांच्यावर झाडण्यात आले, यातील एक गोळी त्यांच्या छातीत लागल्यानं त्यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वीच त्यांना जीवेमारण्याची धमकी आली होती. एसआरए प्रकल्पातील वादातून ही धमकी देण्यात आल्याची माहिती मिळते आहे.

Baba Siddique latest news

नेमकं काय घडलं?

बाबा सिद्दीकी निर्मल नगर इथं एका जाहीर कार्यक्रमासाठी गेले होते. त्यांच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी झाली, त्याआडून हा गोळीबार झाला आहे. त्यांना तीन गेळ्या लागल्याची माहिती साम टीव्हीच्या सुत्रांनी दिली आहे. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळच हा गोळीबाराचा प्रकार घडला आहे. दरम्यान, पोलीस याप्रकरणी सीसीटीव्ही तपासण्याचं काम करत आहेत. बाबा सिद्दीकी हे काँग्रेसमध्ये होते, त्यांनी नुकताच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट तर या भागांत अवकाळी पाऊस लावणार हजेरी, आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

पाणी मागणाऱ्या ६० वर्षीय वृद्ध महिलेला ‘मुले चोरणारी’ समजून मारहाण, नागपूरमधील धक्कादायक प्रकार...

Pune Accident: नवले पूलनंतर पुन्हा भीषण अपघात! जांभूळवाडीत ट्रक धडकून चालकाचा मृत्यू

Latest Marathi Live Update: सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या विश्वस्त नियुक्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती

Iran US Israel War : ‘होर्मुज’ला उत्तर ‘खार्ग’ने? बेट छोटं पण इराणच्या तेलसाम्राज्याचं हृदय... आता जगाला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT