Sharad-Pawar
Sharad-Pawar 
मुंबई

शरद पवारांच्या हस्ते १०० घरांच्या चाव्या सुपूर्द

विराज भागवत

मुंबई: कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी 'म्हाडा’च्या १०० घरांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा कार्यक्रम रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. महाविकास आघाडी सरकारचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपक्रम म्हाडा हाऊसिंग अंतर्गत हाती घेतला होता. या उपक्रमाचा शुभारंभ आज झाला. यावेळी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. शरद पवार यांनी चाव्या सुपूर्द करताना तेथे जितेंद्र आव्हाड आणि डॉ. बडवे यांच्यासह डॉ. श्रीखंडे, गृहनिर्माणचे सचिव श्रीनिवासन, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डिगीकर हेदेखील उपस्थित होते. (NCP Chief Sharad Pawar gives Keys of 100 flats to Tata Hospital under Mhada Housing Schemes for cancer patients relatives)

टाटा मेमोरियल रुग्णालय हे कॅन्सरच्या रुग्णांवर उपचार करण्यारं महत्त्वाचं हॉस्पिटल. या हॉस्पिटलमध्ये केवळ राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून कॅन्सरने ग्रासलेले रूग्ण येतात. या रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईकही असतात. या नातेवाईकांची राहण्याची सोय नसल्याने आणि त्यांना खासगी निवासस्थान परवडत नाही. मग नाईलाजाने त्यांना मुंबईतील फुटपाथवर किंवा आडोशाला आश्रय घ्यावा लागतो. पण आता या रुग्णांच्या नातेवाईकांना 'म्हाडा'कडून घरे दिली गेली. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने हा उपक्रम हाती घेण्यात आला.

काय आहे हा उपक्रम? (Scheme Details)

'म्हाडा'तर्फे देण्यात येणाऱ्या घरांच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते टाटा कॅन्सर हॉस्पिटलला सोपवण्यात आल्या. ३०० चौरस फूटांचे हे १०० फ्लॅट्स आहेत. या घरांच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी टाटा मेमोरियल रूग्णालयाला देण्यात आली आहे. गृहनिर्माण विभाग व टाटा मेमोरियल रूग्णालय यांच्यामध्ये लवकरच तसा करार करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS Live Score : अभिषेक-क्लासेनची शानदार खेळी, हैदराबाद विजयासह प्लेऑफमध्ये; मात्र पंजाबची पराभवासह सांगता

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

SCROLL FOR NEXT