NCP Jitendra Awhad video on Chhatrapati Shivaji Maharaj Hospital in Thane 5 patients died  
मुंबई

Jitendra Awhad : ठाण्यात पालिकेच्या रुग्णालयात 5 रुग्ण दगावले! नातेवाईकांचा आक्रोश; आव्हाड आक्रमक

रोहित कणसे

ठाणे महानगरपालीकेच्या कळवा मधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अनागोंदी कारभार सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या रुग्णालयात उपचार न मिळाल्याने पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. रुग्णांना तपसण्यासाठी डॉक्टर येत नसून रुग्णांना वेळेवर औषध दिले जात नसल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान हा प्रकारामुळे राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हड प्रचंड संतापल्याचे पाहायला मिळाले.

आव्हाडांनी ट्विट करत रुग्णालय प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. रुग्णालयात गेलो असता,रुग्णालयात सुरू असणारे प्रकार पाहून मी सुन्न झालो,तळपायाची आग मस्तकात गेली.

आव्हाड काय म्हणाले?

"गेली अनेक दिवस झाले ठाण्यातील शिवाजी रुग्णालया बाबतच्या तक्रारी कानावर येत होत्या. आज एका महिलेचा फोन आला की, तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत, परंतु रुग्णालय प्रशासन त्यांची व्यवस्थित काळजी घेत नाहीये.काय प्रकार आहे हे जाणून घ्यावा म्हणून रुग्णालयात गेलो असता,रुग्णालयात सुरू असणारे प्रकार पाहून मी सुन्न झालो, तळपायाची आग मस्तकात गेली."

"त्या महिलेचा पती हा जनरल वॉर्ड मध्ये उपचार घेत होता. तेथे पोहचलो असता,संबंधित रुग्णाला ICU मध्ये शिफ्ट करण्यात आले असल्याचे समजले. तिकडे गेल्यावर कळाले की त्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तरी तेथील डॉक्टर्स आणि प्रशासन त्या रुग्णावर 5 तास उपचार करत होते. थोडक्यात रुग्ण आधीच दगावला होता परंतु रुग्णालय प्रशासनाने याची काहीही माहिती त्या महिलेला दिली नव्हती. उलट 5 तास त्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचे ते सांगत होते. याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना आणि डॉक्टरांना जाब विचारला असता, त्या प्रशासकीय अधिकारी आणि डॉक्टर लोकांची बोलती बंद झाली."

"मेलेल्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचं दाखवून त्या रुग्णाच्या पार्थिवाला ICU मध्ये नेण्यात येते. तिथे आधीच गंभीर रुग्ण उपचार घेत असतात. या गंभीर रुग्णांना, दगावलेल्या रुग्णामुळे संसर्ग होऊन त्या जिवंत असणाऱ्या रुग्णांचा देखील जीव अजूनच धोक्यात टाकण्यात येतो. आज दिवसभरात या रुग्णालयात 5 रुग्ण दगावले आहे."

"या रुग्णालयात अक्षरशः गरिबांची फसवणूक आणि लूट सुरू आहे.बिल वाढवून लावली जात आहेत,डॉक्टर वेळेवर कामाला येत नाहीत...इतकंच काय तर मेलेल्या रुग्णांवर देखील उपचार सुरू असल्याचं दाखवून ही मंडळी पैसे कमवत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात हा प्रकार सुरू आहे.यात काही कारवाई होईल ही आशा नाहीच..पण गोर गरिबांच्या सोबत हा जितेंद्र आव्हाड स्वतः उभा राहील हा शब्द मी देतो." असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

रुग्णालयाचे म्हणणे काय?

रुग्णालयात रुग्णांची काळजी घेतली जात नसल्याचा आरोप केला जात आहेत. मात्र रुग्णालय प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अनिरुद्ध माळगावकर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की हे रुग्ण दाखल झाले तेव्हाच अत्यवस्थ होते असा दावा केला आहे.

पहिला रुग्ण दारूच्या आहारी गेलेले होता. त्याने श्वासनलिकेत उलटी केली. दुसरा पेशंट हा हृदविकार येऊन तिसऱ्या स्टेजला आला. तिसरा पेशंट रस्त्यावरचा होता त्याला.... आम्ही रात्रदिवस अविरत काम करतोय. लोकांना प्रयव्हेटमध्ये लोकांना परवडत नाहीत. दोन-तीन दिवस प्रायव्हेटमध्ये ठेवून पुन्हा एकडे येतात. बाहेर मरणार त्यापेक्षा आम्ही इलाज करतो, अशावेळी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. हे तीन पेंशंट खरंच अत्यावस्थ होते", अशी माहिती दिली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT