Baba Siddique with Bollywood celebrities at a star-studded event, showcasing his deep connections in the film industry. Esakal
मुंबई

Baba Siddique Political Career: बिहार जन्मभूमी तर मुंबई कर्मभूमी; राजकारणासह सिनेसृष्टीत बाबा सिद्दीकींनी कसा निर्माण केला दबदबा?

Baba Siddique Bollywood Connection: बाबा सिद्दीकी हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातून 1999, 2004 आणि 2009 मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते.

आशुतोष मसगौंडे

Baba Siddique Political Career And Bollywood Stars:

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची राजकीय कारकीर्द मोठी आहे. विशेष म्हणजे बिहारपासून राज्यापासून हजारो कि.मी दूर असलेल्या मायानगरी मुंबईत स्थायिक झालेल्या बाबा सिद्दीकी यांचा बिहारशी संबंध अनेक दशकांनंतरही तुटलेला नाही.

सप्टेंबर 1956 मध्ये जन्मलेल्या बाबांनी विद्यार्थीदशेपासूनच राजकारणाला सुरुवात केली. 1977 मध्ये, बाबा सिद्दीकी काँग्रेस पक्षाची विद्यार्थी शाखा NSUI मध्ये सहभागी झाले. नंतर, बाबा सिद्दीकी मुंबईच्या बांद्रा पश्चिम अशा भागात स्थायिक झाले, जे बॉलीवूड अभिनेत्यांसाठी ओळखले जाते.

वांद्रे पश्चिमेचे आमदार राहिलेल्या बाबा सिद्दीकी राजकारणातून जसा वेळ मिळायचा तसे बिहारला जात असत. त्याच्याशी संबंधित मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाबा दोन वर्षांपूर्वी 2022 मध्ये बिहारला गेले होते. बिहारच्या गोपालगंज येथे जन्मलेले बाबा सिद्दीकी हे त्यांचे वडील अब्दुल रहीम सिद्दीकी यांच्यासह तरुण असताना घड्याळ दुरुस्तीचे काम करायचे. सुमारे पाच दशकांपूर्वी वडिलांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा बाबा सिद्दीकीही कुटुंबासह मुंबईत आले.

राजकीय प्रवास

बाबा सिद्दीकी हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातून 1999, 2004 आणि 2009 मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते. 2004 ते 2008 दरम्यान त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार आणि FDA राज्यमंत्री म्हणूनही काम केले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

अनेक वर्षे काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी गेल्या फेब्रुवारीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. .

बॉलिवूड

बाबा सिद्दीकी इफ्तार पार्ट्यांसाठीही खूप प्रसिद्ध होते. दरवर्षी बॉलीवूडचे मोठमोठे स्टार्स आणि नावाजलेले लोक त्यांच्या पार्ट्यांमध्ये हजेरी लावत. त्यांच्या इफ्तार पार्टीने सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील वाद मिटवला होता.

बाबा सिद्दीकी यांचे सलमान खानशी घट्ट नाते होते आणि ते अनेकदा सलमानसोबत समाजसेवेची कामे करायचे.

बाबा सिद्दीकी त्यांना केवळ एक राजकीय नेता म्हणूनच नव्हे तर एक सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ओळखले जायचे. 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर 2019 मध्ये त्यांचा झीशान सिद्दीकी यांनी विधानसभा लढवली आणि जिंकली, झिशान आता राजकारणात सक्रिय आहेत आणि त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT