उद्धव ठाकरे  Esakal
मुंबई

'शरद पवारांनी ठरवलंय... 2024 मध्येही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री'

महाविकास आघाडी सरकार योग्यरित्या कारभार करीत असून 2024 नंतरही हेच सरकार येणार असल्याचे ते म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्रात 2024 मध्ये होणाऱ्या निवडणूक महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Government In Maharashtra ) एकत्र सामोरे जाणार असून त्यावेळीदेखील महाविकास आघाडीचेच सरकार अस्तित्त्वात येईल, तसेच त्यावेळीदेखील शरद पवार यांच्या मनातीलच मुख्यमंत्री होईल आणि पवारांच्या (Sharad Pawar) मनातील मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेच (Uddhav Thackeray) आहेत, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे. ते ऐरोली येथे घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. मात्र, यावेळी त्यांनी शिवसेनेवर टिकादेखील केली आहे.

येत्या काही महिन्यांत नवी मुंबई महानगर पालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विभागवार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. ऐरोली येथे घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री जितेंद्र आव्हाड मार्गदर्शन करत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार योग्यरित्या कारभार करीत असून 2024 नंतरही हेच सरकार येणार असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांवर दबाव नाही

मुख्यमंत्र्यांना स्वतंत्र्यपणे निर्णय घेण्यात अडचण येते. शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव असतो, असे बाहेर पसरवले जात आहे. मात्र यामध्ये कोणतेही तथ्य नसून शरद पवार यांचा पूर्ण पाठिंबा उध्दव ठाकरे यांनाच असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री असलेल्या पदाला मान दिला पाहिजे. तसेच ते घेतील त्या निर्णयाचे आपण स्वागत केले पाहिजे, अशी शिकवण पवारांनी आम्हाला दिली आहे, असेदेखील आव्हाड यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : बाणेर पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT