ncp nawab malik to meet ajit pawar on devgiri bungalow bjp 
मुंबई

नवाब मलिक-अजित पवारांची देवगिरी बंगल्यावर भेट! महत्त्वाच्या विषयावर चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत. सुनिल तटकरे देखील देवगिरीवर पोहोचले आहेत.

कार्तिक पुजारी

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत. सुनिल तटकरे देखील देवगिरीवर पोहोचले आहेत. नवाब मलिक आणि अजित पवार यांच्यामध्ये महत्त्वाची चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येतंय. असे असले तरी नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होईल याबाबत कळू शकलेलं नाही. (ncp nawab malik to meet ajit pawar on devgiri bungalow bjp)

नवाब मलिक यांच्यावरुन महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला होता. अशात नवाब मलिक अजित पवारांची भेट घेण्यासाठी देवगिरीवर आले असल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक सभागृहात आले होते. त्यावरुन मोठा गदारोळ झाला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात अजित पवारांना पत्र लिहिलं होतं.

गंभीर गुन्ह्यात आरोप असलेले नवाब मलिक यांना सोबत घेऊ नये अशा आशयाचं पत्र फडणवीसांनी अजित पवारांना लिहिलं होतं. या मुद्द्यावरुन अजित पवारांनी मौन बाळगलं. त्यानंतर मुख्यमंत्री यांनी याबाबत माझी समजूत काढली आहे. हा विषय इथेच संपला असं ते म्हणाले होते. पण, आता नवाब मलिक हे देवगिरीवर आले असल्याने त्यांचा अजित पवार गटाला पाठिंबा आहे का? असा प्रश्व पडला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदारसंघातील कामे होत नसल्याने नबाव मलिकांनी अजित पवारांची भेट घेतली आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT