SHARAD PAWAR NCP 
मुंबई

शरद पवार उपचारासाठी रुग्णालयात दाखल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पोटदुखीचा त्रास होऊ लागल्यानं त्यांना रुग्णलयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शरद पवार यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. 31 मार्च रोजी शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं समजते. तसंच एन्डोस्कोपी करण्यात येणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. 

दरम्यान, शरद पवार यांची तब्येत रविवारीच थोडी बिघडली होती. सध्या त्यांना ८-१० दिवस आरामाची गरज आहे. एक छोटी शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचा केरळ आणि एप्रिलमधील बंगालचा दौरा रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतोय! सिद्धरामय्यांची घोषणा, डीके शिवकुमार यांनी चरणस्पर्श करत घेतले आशीर्वाद

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

Washim Accident: आनंदाचा क्षण काळ ठरला! धोंड्याच्या जेवणावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात दोन चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू..

Kalyan Crime : ६ महिन्यांपूर्वी लग्न केलेल्या २५ वर्षीय लेकीची हत्या, वडिलांवरच संशय; काय घडलं?

Asian Relay India Host: भारताला मिळाली सर्वात मोठी गूड न्यूज! आशियाई स्पर्धांचे यजमानपद बहाल; पण सामने 'या' दोन शहरांत का होणार?

SCROLL FOR NEXT