ठाणे : विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्यानंतर प्रमिला केणे यांचे अभिनंदन करताना महापौर नरेश म्हस्के व इतर नगरसेवक (छायाचित्र : दीपक कुरकुंडे) 
मुंबई

राष्ट्रवादीच्या 'या' नगरसेविका ठरल्या ठाणे पालिकेच्या दुसऱ्या विरोधी पक्षनेत्या 

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रमिला केणी यांची निवड झाली असून गुरुवारी (ता. 19) झालेल्या महासभेत महापौर नरेश म्हस्के यांनी त्याची अधिकृत घोषणा केली. महापालिकेच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच एका महिलेला विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळाली आहे. 

ठाणे महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रमिला केणी सर्वाधिक मतांनी निवडून आल्या होत्या. कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी व वारसा नसलेल्या केणी कळव्यातून 2012 मध्ये प्रथमच राष्ट्रवादीच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. पती मुकुंद केणी यांच्यासोबत आधीपासूनच सामाजिक बांधिलकीचे काम करणाऱ्या केणी यांनी नगरसेवकपदाच्या पहिल्या वेळेपासून कळव्यातील मूलभूत समस्या सोडवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यांचे पती मुकुंद केणीही याच निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 

2017 च्या पालिका निवडणुकीत ठाणे महापालिकेतील सर्वोच्च मताधिक्‍याने (10,000) निवडून येण्याचा मान प्रमिला केणी यांनी पटकावला होता. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रमिला केणींना विरोधी पक्षनेतेपद बहाल करत त्यांच्या कामाचा गौरव केला. तसेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महिलांकरिता 50 टक्के पदांबाबत आखलेल्या धोरणाला खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CCMP BHMS Registration : सीसीएमपी-बीएचएमएस नोंदणीला राज्य सरकारचा हिरवा कंदील; आयएमएकडून राज्यव्यापी सेवा बंदची घोषणा

PMC Development : स्वच्छतागृहे दुरुस्तीऐवजी पाडण्यावर नगरसेवकांचा भर; ५५ प्रस्ताव नव्या बांधकामासाठी

Crime News : माहूरवरून परतणाऱ्या नवविवाहितांवर थरारक हल्ला; नववधूसह दोन लाखांची रोकड लंपास

Karad News : मतदारयादी सखोल पुनरिक्षणात कऱ्हाड दक्षिणची बाजी; पुणे विभागात प्रथम

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? केंद्र सरकारने विंडफॉल कराच्या दरात केली मोठी वाढ

SCROLL FOR NEXT