मुंबई

VIDEO : नदीत वीज वाहिनीवर अडकलेल्या दोन कर्मचाऱ्यांची सुटका

नविद शेख

मनोर: वैतरणा नदी काठचे (Vaitarana River) विजेचे खांब (Electrical Board) पडल्याने दुरुस्ती चे काम सुरू असताना वैतरणा नदीच्या पात्राच्या मध्यात विजवाहिन्यांवर अडकलेल्या कामगारांना (Workers) शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास एनडीआरएफ (NDRF) च्या जवानांकडून बाहेर काढण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळ पासून नदीच्या प्रवाहातून (River water) मार्ग काढत दोन खांबांमध्ये विजवाहिनी जोडण्यासाठी पलीकडे नेण्याचे काम सुरू होते. मधुकर सातवी आणि प्रदीप भुयाळ असे रेस्क्यू केलेल्या कामगारांची नावे आहेत. (NDRF rescued workers who stuck in vaitarana river while electrical reparing-nss91)

नदी पात्रात विजवाहिन्यां वर अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी महावितरणचे उप कार्यकारी अभियंता संजय कोल्हे यांच्या कडून जिल्हा प्रशासनाला साकडे घालण्यात आले होते. उप जिल्हाधिकारी किरण महाजन यांनी तात्काळ एन डी आर एफ च्या पथकाला वैतरणा नदी किनारी पाठवून दिले होते.सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक वैतरणा नदी काठावर दाखल झाले होते.त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले होते.वैतरणा नदीच्या जोरदार प्रवाहात स्पीड बोट च्या साहाय्याने दोन कामगारांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी विजवाहिन्यांवर अडकलेल्या कामगारांना रस्सीच्या साहाय्याने बोटीत उतरवण्यात आले, त्यानंतर त्यांना नदी किनारी टाकवाहल गावच्या बाजूने उतरवण्यात आले.

मधुकर सातवी आणि प्रदीप भुयाळ असे रेस्क्यू केलेल्या कामगारांची नावे आहेत. दरम्यान नदी पात्रातून विजवाहिन्यां पलीकडे नेण्यासाठी एन डी आर एफ च्या पथकाचे जवान आणि स्पीड बोट ची मदत घेतली जात आहे. वैतरणा नदीला पुर आल्याने ढेकाळे फिडर ला वीजपुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्यांचे खांब नदी काठी पडले होते.त्यामुळे नदीच्या प्रवाहात विजवाहिनी तुटून ढेकाळे फिडर चा वीजपुरवठा बुधवारी सायंकाळ पासून खंडित झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suhas Subramanyam: कोण आहेत भारतीय वंशाचे सुहास सुब्रमण्यम? अमेरिकेत डंका! ट्रम्प यांच्या पक्षाच्या उमेदवाराला चारली धूळ!

Latest Marathi News Live Update: अहिल्यानगर शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

IND vs NZ 1st ODI Live : अर्शदीप सिंगशी जो नडला, त्याला त्याने...! न्यूझीलंडच्या फलंदाजांची दैना, भारताचे वर्चस्व Video Viral

Politics News: पक्ष कमजोर होत असल्याची भावना ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीतील सूर

Pune-Bengaluru Highway Traffic : कराड ते सातारा वाहतूक ठप्प! स्वाभिमानीच्या 'बेमुदत चक्का जाम'मुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, रात्री उशिरा वाहने पर्यायी मार्गाने वळवली

SCROLL FOR NEXT