मुंबई

जनतेची विचारपूस करताय की धमक्या देताय?- निलेश राणे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रभाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. मुंबईतही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. एकूण परिस्थिती लक्षात घेता मुंबईच्या काही भागांमध्ये लॉकडाउन करावा लागू शकतो असे संकेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले. त्या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की सध्या नागरिक कोरोनाच्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबईत अंशत: लॉकडाउन लावला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण किशोरी पेडणेकर यांच्या याच संकेतावर माजी खासदार निलेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली.

"ज्याप्रकारे मुंबईच्या महापौर मुंबईमध्ये काही ठिकाणी फिरताना दिसतायत, त्या विचारपूस करतायत की धमकी देतायत हेच कळत नाही. मुंबईच्या महापौरपदाला तसं फार महत्त्व नाही. (त्यामुळे) महापौरांनी उगाच भीतीचं वातावरण पसरवू नये. आधीच मुंबईची अर्थव्यवस्था बिकट होत चालली आहे आणि त्यात लॉकडाऊनच्या धमक्या देऊ नये", असं ट्वीट निलेश राणे यांनी केलं.

काय म्हणाल्या होत्या महापौर...

दरम्यान, मुंबईत जानेवारी महिन्यामध्ये करोनाचा प्रादुर्भाव हळूहळू नियंत्रणात येऊ लागला होता. पण सध्या मास्क न घालता फिरणारे नागरिक आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवणारे नागरिक यांच्यामुळे नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. या अशाच कारणांमुळे फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मार्च महिन्यात तर रोज नव्या करोनाबाधितांची संख्या नवा उच्चांक गाठत आहे. त्यामुळे ठराविक ठिकाणी लॉकडाउन करावे लागेल, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या होत्या.

हाय-सोसायटी परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सध्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. करोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळविण्यासाठी गर्दीची ठिकाणे, धार्मिक स्थळे, बाजारपेठा, लोकल ट्रेन यांच्यावर निर्बंध घालण्याची गरज नजिकच्या भविष्यकाळात भासू शकते. आता याबाबत मुख्यमंत्री लवकरच योग्य तो निर्णय घेतील, असेही पेडणेकर यांनी स्पष्ट केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: भाजप विनोद तावडेंवर महत्त्वाची जबाबदारी सोपवणार? लवकरच मोठा निर्णय होणार; जाणून घ्या पडद्यामागच्या हालचाली

Mumbai News: चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं; 10 विद्यार्थी जखमी, एकाचा मृत्यू

Hardik Pandya News : हार्दिकने 'Mumbai' सोडली! क्रिकेट करियर वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल; नेमकं काय घडलं?

Eknath Shinde: ''सागर बंगल्यावर पोलिस पाठवले तेव्हा...'', ठाकरेंच्या फडणवीसांवरील भूमिकेवरुन एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

VAIBHAV SOORYAVANSHI: प्लेइंग XI मध्ये वैभव सूर्यवंशी दिसणार? कोणाचा पत्ता कट होणार आकाश चोप्रांनी घेतलं थेट नाव! म्हणाला...

SCROLL FOR NEXT