मुंबई

प्रशासनाचा निष्काळजीपणा मुंबईकरांच्या जीवावर बेतेल; सुरक्षेची हमी देण्याची दरेकर यांची मागणी

कृष्ण जोशी

मुंबई  ः आखाती देशातून परत आलेल्या अभिनेत्यांनी पालिकेच्या निष्काळजीपणामुळे विलगीकरणात न राहता मुंबईकरांमध्ये मिसळण्याचा पराक्रम केला आहे. पालिकेचा हा निष्काळजीपणा मुंबईकरांच्या जीवावर बेतेल, अशी खरमरीत टीका विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.  

आखाती देशातून मुंबईत आल्यावर नियमानुसार संस्थात्मक विलगीकरणात न जाता घरी गेल्यामुळे अभिनेता सोहेल खान, अरबाज खान आणि त्याचा पुत्र निर्वाण खान या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी परदेशातून आल्यावर स्वतःला हॉटेलमध्ये क्वारंटाइन केल्याचे सांगितले. परंतु तसे न करता ते आपल्या घरी गेले, यामुळे  पालिकेचा निष्काळजीपणा समोर आला. हा निष्काळजीपणा मुंबईकरांच्या जीवावर बेतेल याचे भान महापालिका आणि सरकारला आहे का ? असा प्रश्नही दरेकरांनी विचारला.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकार अनेक उपायोजना करत आहे, रात्रीची संचारबंदीही लावली आहे. तर दुसरीकडे या अभिनेत्यांच्या बाबतीत नियम पाळले जात नाहीत. यातून सरकारचा निष्काळजीपणा दिसून येत आहे, अशी टिका दरेकरांनी केली. प्रशासनाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे, हा निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व असे प्रकार पुन्हा होणार नाहीत याची हमी मुंबईकरांना द्यावी, अशीही मागणी दरेकर यांनी केली.

The negligence of the administration will cost the lives of Mumbaikars

----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rally: पुतिन जसं विरोधकांना संपवतात, तसाच प्रयत्न मोदींकडून सुरु; अरविंद केजरीवाल यांचा घणाघात

Mega Block : रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल!

Microsoft linkedin Work Trend: भारतातील किती टक्के कर्मचारी कामाच्या ठिकाणी AI चा वापर करतात?

Karad News : कऱ्हाड बाजार समितीत कोल्हापूरच्या शेतकऱ्याच्या गुळाने खाल्ला भाव; क्विंटलला मिळाला 'इतका' उच्चांकी दर..

Latest Marathi News Live Update: मुंबईसाठी महाविकास आघाडीनं काय केलं? फडणवीसांचा सवाल

SCROLL FOR NEXT