Ladki Bahin Yojana esakal
मुंबई

लाडकी बहीण योजनेत निष्काळजीपणा सहायक आयुक्तांच्या अंगलट, डॉ.अझिझ शेख यांच्या आदेशनव्ये तडकाफडकी निलंबित

महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेत महिलांच्या खात्यावर दर महिन्याला 1500 रुपये जमा होणार आहेत.

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत करण्यात आलेला निष्काळजीपणा उल्हासनगर महानगरपालिकेतील सहायक आयुक्त दत्तात्रय जाधव यांच्या अंगलट आला आहे.योजनेचे महत्त्व गांभीर्याने घेतले नसल्याने आयुक्त डॉ.अझिझ शेख यांच्या आदेशनव्ये सामान्य प्रशासन विभागाने जाधव यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.

महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेत महिलांच्या खात्यावर दर महिन्याला 1500 रुपये जमा होणार आहेत.त्यामुळे महिलांसाठीची ही योजना प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडून सर्व महापालिका प्रशासनाला कामाला लावण्यात आले आहे.

यासाठी प्रभाग समिती स्तरावर जाहिरात बाजी,ऑनलाइन सेंटर उघडणे,ऑफलाईन अर्ज स्वीकारणे आदी कामे सहाय्यक आयुक्तांना सोपवण्यात आली आहेत. ही योजना मुख्यमंत्र्यांची महत्त्वकांशी योजना असल्याने या योजने संबंधी मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रत्येक दिवसाला कॉन्फरन्स मीटिंग घेऊन लेखाजोखा घेतला जात आहे.

गुरुवारी आयुक्त डॉ.अझिझ शेख यांच्या दालनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची व्हिडीओ कॉन्फरन्स मीटिंग होती.या बैठकीला संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते.मात्र प्रभाग समिती 3 चे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय जाधव वगळता सर्वांनी उपस्थिती लावली होती.

दरम्यान कुणाच्या प्रभागात किती महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला त्याचा अहवाल सादर करण्याच्या वेळी सहायक आयुक्त गणेश शिंपी,मनिष हिवरे,अनिल खतुरानी यांनी योजनेला गती दिल्याची आकडेवारी समोर आली असतानाच दत्तात्रय जाधव यांची पीछेहाट असल्याचे उघड झाले.याचे समाधानकारक उत्तर जाधव यांना देता आले नाही.त्यामुळे आयुक्त डॉ.अझिझ शेख यांच्या आदेशनव्ये सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मनिष हिवरे यांनी जाधव यांना निलंबित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Safety : प्रखर एलईडी दिवे, काचेवर काळ्या फिल्म; मावळात चारचाकी चालकांच्या हाैसेमुळे अपघात, गैरप्रकारांना निमंत्रण

Bhadrakaal 2025: 'या' काळात भावाला राखी बांधणं मानलं जातं अशुभ! जाणून घ्या भद्राकाळ म्हणजे काय

डोक्याला पट्टी, हाताला फ्रॅक्चर... सायलीची ती भीती खरी ठरणार? अर्जुनच्या गाडीचा अपघात होणार; 'ठरलं तर मग' मध्ये काय घडणार?

Maharashtra Karnataka Dispute : महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये राजकीय संघर्ष पेटणार,‘आलमट्टी’ची उंची वाढविणे हा हक्कच; कर्नाटकचा दावा

आता धमकी नाही तर सरळ जीव घेणार..सलमानच्या बरोबर काम करणाऱ्यांना लॉरेंस गँगकडून आणखी एक धमकी

SCROLL FOR NEXT