oxygen  file photo
मुंबई

राजेश टोपेंनी ऑक्सिजनबद्दल दिली महाराष्ट्राची चिंता वाढवणारी माहिती

काय म्हटलय शेजारच्या राज्यांनी....

दीनानाथ परब

मुंबई: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. पॉझिटिव्ह असूनही कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त असली, तरी अत्यवस्थ असलेल्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. कोरोनामुळे रुग्णाची स्थिती गंभीर झाल्यानंतर शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे रुग्णाच्या शरीराला कुत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागतो. सध्या महाराष्ट्राच्या वेगवेगळया भागात कोरोनाचे लाखो सक्रिय रुग्ण आहेत.

गंभीर असलेल्या बहुतांश रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवावे लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मागणी वाढत चालली आहे.

कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना रस्तेऐवजी हवाई मार्गाने ऑक्सिजनची उपलब्ध करुन देण्याची पंतप्रधान मोदींकडे विनंती करणार असल्याचे सांगितले. राज्यात दररोज १२०० मेट्रीक टन ऑक्सिजनचे उत्पादन होते. त्यात सध्या दररोज ९५० मेट्रीक टन ऑक्सिजन कोरोनासाठी वापरावा लागत आहे. राज्यातले हे दाहक वास्तव आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आणि ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन महाराष्ट्राने शेजारील राज्यांकडे मदत मागितली आहे. महाराष्ट्राने शेजारच्या राज्यांकडे वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी संपर्क साधला आहे. पण शेजारी राज्यांकडून मिळालेला प्रतिसाद निराशाजनक आणि महाराष्ट्राची चिंता वाढवणारा आहे.

शेजारच्या राज्यातही ऑक्सिजनला मागणी असल्याने त्यांनी पुरवठा करण्यास असमर्थता दर्शवली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी ही माहिती दिली. पीटीआयने हे वृत्त दिले आहे.

ऑक्सिजनला मोठी मागणी असल्याने महाराष्ट्राला वैद्यकीय ऑक्सिजन वाया घालवण्याचे प्रमाण कमी करावे लागेल. वैद्यकीय दर्जाच्या ऑक्सिजनचा वापर कोविड-१९ च्या रुग्णांवर उपचारासाठी केला जात आहे.

श्वसनाशी संबंधित अन्य विकारांवरही हा ऑक्सिजन वापरला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT