nep national education policy sndt 48 course launch less duration Sakal
मुंबई

Mumbai News : एनईपीच्या पार्श्वभूमीवर एसएनडीटीत ४८ अल्प मुदतीचे नवे अभ्यासक्रम

स्ट्रॅटेजिक लीडरशिप, इंट्रोडक्शन टू जेंडर स्टडीज आदी अभ्यासक्रमाचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ,(एसएनडीटी) ने  मोठा पुढाकार घेतला आहे. त्यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आणि आपल्या करियरसाठी आवड निर्माण होईल असे तब्बल 48 अल्प मुदतीचे नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.

या अभ्यासक्रमाचा उद्घाटन सोहळा विद्यापीठाच्या चर्चगेट संकुल येथे असलेल्या सर सीताराम आणि लेडी शांताबाई पाटकर सभागृहात पार पडला. यावेळी  विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांच्यासह डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत, सहायक संचालक, दुरुस्थ आणि मुक्त शिक्षण संस्था, तसेच  विभागप्रमुख, शिक्षक आणि विद्यार्थी आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (एनईपी2020) च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेले हे सर्व 48 नवे अभ्यासक्रम  2 क्रेडिटचे आहेत. हे सर्व पदव्युत्तर स्तरावरावर विद्यापीठाच्या चर्चगेट, जुहू आणि पुणे कॅम्पसमध्ये सुरू केले जात असल्याची माहिती विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी दिली.

उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रजनीश कामत यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भातील महत्त्व विषद केले. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि जगाला एक चांगले स्थान बनवण्यासाठी  केवळ गुणांसाठीच नव्हे तर ज्ञान आणि कौशल्ये मिळवण्यासाठी त्यांचे शिक्षणाचे ध्येय पुन्हा शोधणे आवश्यक असून त्यावर भर द्यावा असे आवाहन केले.

तसेच जगातील नागरिक म्हणून विद्यार्थ्यांना त्यांची कर्तव्ये, भूमिका आणि जबाबदाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या आहेत.  त्याची विद्यार्थ्यांनी कायम आठवण ठेवून देश विकासात आपले योगदान दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. प्रा. उज्वला चक्रदेव, आपल्या  अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या, विद्यापीठात सुरू होणाऱ्या सर्व अल्पकालीन अभ्यासक्रमांचे कौशल्य विकास आणि आपल्या करियरसाठी  विद्यार्थ्याना मोठे लाभ होतील.

हे ऑफलाइन अभ्यासक्रम विकसित करण्यामागील हेतू आणि ते केवळ त्यांच्या मुख्य विषयापुरतेच मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना देशाचे चांगले नागरिक होण्यासाठी कौशल्य विकसित करण्यास कसे हातभार लावेल याचा त्यात साकल्याने विचार करण्यात आला असल्याचे कुलगुरू म्हणाल्या.

तसेच या नव्या अभ्यासक्रमात सर्व रोजगाराभिमुख असे स्ट्रॅटेजिक लीडरशिप, इंट्रोडक्शन टू जेंडर स्टडीज, स्टार्टअप एंटरप्रेन्योरशिप, फोटोग्राफीची मूलभूत माहिती, घरगुती आर्थिक व्यवस्थापन, एनजीओ मॅनेजमेंट आदी अभ्यासक्रम असून त्याचा विद्यार्थ्याना मोठा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

असे चालतील अभ्यासक्रम

विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक करिअरसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे २ क्रेडिटचे नवे अभ्यासक्रम  हे विद्यापीठाच्या तीन कॅम्पसमध्ये चालतील. त्यात मुंबईतील चर्चगेटमधील २१, जुहूमधील १७ आणि पुण्यातील कॅम्पस मध्ये एकूण १० अभ्यासक्रम चालतील. विद्यार्थांना रोजगाराभिमुख होण्यासाठी डिझाइन केलेले हे अभ्यासक्रम ऑफलाइन केले जातील, पूर्ण झाल्यावर सहभागींना प्रमाणपत्रे दिले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT