matheran mini train sakal
मुंबई

Mini Train : नेरळ-माथेरान मिनी ट्रेन शनिवारपासून होणार सुरू

दिवाळी निमित्त माथेरान फिरायला येणाऱ्या प्रवासी, पर्यटकांना मिळणार दिलासा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - माथेरानची राणी म्हणून ओळख असलेल्या नेरळ-माथेरान मिनी ट्रेनची थेट शनिवार ४, नोव्हेबरपासून पुन्हा प्रवाशांचा सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये माथेरानला येणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहेत.

माथेरान हे मुंबई महानगरातील आणि पुण्यातील पर्यटकांसाठी सर्वाधिक जवळचे थंड हवेचे ठिकाण आहे. त्यामुळे अनेक पर्यटक एक दिवसीय किंवा काही दिवसीय सहलीचे नियोजन करतात. पर्यटकांना येथील मिनी ट्रेनचेही खूप आकर्षण आहे.

मात्र, पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या भितीने आणि पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेऊन मध्य रेल्वे दरवर्षी मान्सून काळात खबरदारीचा उपाय म्हणून नेरळ-माथेरान मिनी ट्रेनची सेवा बंद करण्यात येते. आता पुन्हा शनिवारपासून नेरळ ते माथेरान दरम्यान थेट मिनी ट्रेन सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे दिवाळीत माथेरानला फिरायला येणाऱ्या प्रवासी,पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

डाऊन मार्ग

नेरळ- माथेरान

सकाळी ७ वाजता - सकाळी १०.४० वाजता

सकाळी ८.५० वाजता - सकाळी ११.३० वाजता

सकाळी १०.२५ वाजता - दुपारी १.०५ वाजता

अप मार्ग

माथेरान-नेरळ

दुपारी १२.२५ वाजता - दुपारी ४.३० वाजता

दुपारी २.४५ वाजता - संध्याकाळी ५.३० वाजता

दुपारी ४ वाजता - संध्याकाळी ६.४० वाजता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT