Gangster Chirag Loke Die sakal
मुंबई

Gangster Chirag Loke Dies: चिराग लोके हत्या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी मुंब्य्रातुन केली अटक

वादातून गुंडाची हत्या; मुख्य आरोपी अटकेत |Killing of a gangster due to dispute; Main accused arrested

सकाळ वृत्तसेवा

Gangster Chirag Loke Die: मानखुर्द येथील माथाडी साईट मिळविण्याच्या वादातून नेरूळमध्ये चिराग महेश लोके (वय ३०) या गुंडाची हत्या करून फरार झालेल्या एका मारेकऱ्याला नेरूळ पोलिसांनी मुंब्रा येथून अटक केली आहे. अरबाज शेख असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे. (Gangster Chirag Loke Die )

नेरूळ सेक्टर २० मध्ये राहणारा चिराग लोके व त्याची हत्या करणारा आरोपी अरविंद सोडा यांच्यात मानखुर्द येथील माथाडी साईटचे काम मिळवण्यावरून काही महिन्यांपासून वाद सुरू होता. चिरागने हे काम सोडावे यासाठी त्याला धमकावण्यात आले होते.

तरीही चिरागचे प्रयत्न सुरूच होते. त्यामुळे अरविंद सोडा व त्याच्या पाच-सहा साथीदारांनी त्याचा कायमचा काटा काढण्यासाठी मंगळवारी सायंकाळी चिरागला त्याच्या घराजवळ गाठून त्याच्यावर लोखंडी रॉड व इतर हत्याराने प्राणघातक हल्ला केला. यात त्याची पत्नीही जखमी झाली होती. चिरागचा हल्ल्यात जागीच मृत्यू झाला होता.

घटनेनंतर नेरुळ पोलिसांनी आरोपी अरविंद रामनाथ सोडा, अरबाज, पगला, शेरा व इतर हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी मुंब्रा येथे मावशीच्या घरी लपून बसलेल्या अरबाज शेख याला अटक केली आहे.(navi mumbai crime)

विविध पोलिस ठाण्यात गुन्हे

चिराग लोके व आरोपी अरविंद सोडा हे दोघेही नेरूळ गाव सेक्टर २० मध्ये राहण्यास होते. हे दोघे वेगवेगळ्या गुन्ह्यांत तुरुंगात एकत्र असताना त्यांची एकमेकांशी ओळख झाली होती. नवी मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई केली होती. चिराग लोके हा २०१८ पासून तुरुंगात होता. दीड वर्षांपूर्वी तो बाहेर आला होता. चिराग लोके याच्यावर सायन, वाशी, कफ परेड आणि नेरूळ या पोलिस ठाण्यांत चोरी आणि जबरी चोरीचे आठ गुन्हे दाखल आहेत.(maharasthra crime news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘देवीचा अवतार घेऊ पाहिलं आणि स्टेजवरच अपमान झाला!’ ममता कुलकर्णीचा व्हिडिओ तुफान व्हायरल!

Nashik Elections : मतदारयादीत मनमानीला चाप; आयोगाचे प्रभागनिहाय याद्यांसाठी कठोर निर्देश!

Nagpur News: नागपूर-जबलपूर महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील पाच जणांनी विष प्राशन करून संपवलं जीवन; पती-पत्नीसह तीन मुलांचा समावेश, का घेतला असा निर्णय?

Latest Maharashtra News Updates : एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पुण्यात बॅनरबाजी

SCROLL FOR NEXT