मुंबई

नेस्कोच्या कोविड केंद्राचा खर्च कोट्यवधीच्या घरात, पालिका म्हणते...

मिलिंद तांबे

मुंबई: गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात 2 हजार खाटांचे कोविड केंद्र उभारण्यासाठी महापालिकेने 10 कोटी 89 लाख रुपये खर्च केले आहेत. प्रशासनाने विशेष अधिकारात हा खर्च केला असून आज स्थायी समितीपुढे ही माहिती मांडण्यात आली होती. या प्रस्तावाला स्थायी समितीने कार्येत्तर मंजूरी दिली आहे.  

नेस्को येथे कोविड केंद्र उभारण्यासाठी महापालिकेने केलेला खर्च सुरुवातीपासून संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या प्रकरणात भाजपने लोकायुक्तांकडेही तक्रार दाखल केली आहे. कोविड काळात तातडीचे काम म्हणून निविदा न मागवता हा 10 कोटी रुपयांचा ठेका प्रशासनाने दिला होता. या प्रस्तावाला स्थायी समिती विरोध करण्यात आला. मात्र हा फक्त कार्येत्तर मंजूरीचा विषय असल्याने नाईलाजाने या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. भाजपने सुरुवातीपासूनच कोविड खर्चावर आक्षेप घेतला असून या प्रस्तावाचीही चौकशी होण्याची गरज असल्याचे भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.

पालिका काय म्हणते

या कामासाठी या कंत्राटदाराला तब्बल दहा कोटी 89  लाख 77 हजार रूपये मोजले गेले आहेत. तीन महिन्यांचे हे कंत्राट असून त्यानंतर कंत्राटदाराने मोफत सुविधा पुरवणार आहे. मात्र हा पुरवठा पुढे किती महिने करणार, याचा कोणताही उल्लेख पालिकेने  प्रस्तावात केलेला नाही. कंत्राट कालावधी संपल्यानंतर खुर्च्या, पंखे, हॅलोजन, सलाईन स्टॅण्ड वगैरे साहित्य कंत्राटदार पालिकेला विनामूल्य देणार आहे, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Nesco Covid Center spent 10 crore 2 thousand bed Goregaon

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना गुडन्यूज! ऑगस्टचा हप्ता खात्यात जमा, सरकारकडून मोठी भेट

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये सुवर्ण हॅटट्रिक! कुस्तीपटू सुजीत कालकलचे रोमहर्षक सुवर्ण, भारताची पदकतालिकेत मोठी भरारी

गायत्री दातारने सांगितलं कसं आहे सासरचं वातावरण; म्हणते- सासूबाई मला काम करू देत नाहीत कारण...

Latest Marathi News Live Update : मनोज जरागेंच्या ११ समर्थकांविरोधात गुन्हा

Mohol Drought : मोहोळ तालुक्यातील सहा हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पुर्ण,अद्याप ही काम सुरू;

SCROLL FOR NEXT