मुंबई

'डुकराशी कुस्ती खेळू नका, घाण तुमच्याच अंगाला लागते' फडणवीसांचं सूचक टि्वट

जॉर्ज बनार्ड शॉ यांचा कोट टि्वट केला आहे.

दीनानाथ परब

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (Ncp) आणि प्रवक्ते नवाब मलिक (Nawab malik) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केला. फडणवीसांचे अंडरवर्ल्डशी (Underworld) संबंध असल्याचा आरोप केला. "देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री असताना अंडरवर्ल्डच्या लोकांना सरकारी कमिशन, सरकारी बोर्डाचे अध्यक्ष का बनवलं?" असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला.

नवाब मलिकांच्या या आरोपांनंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक सूचक टि्वट केलं आहे. त्यांनी कोणाचही नाव घेतलेलं नाही. पण 'आजच्या दिवसाचा विचार' असं म्हणत त्यांनी जॉर्ज बनार्ड शॉ यांचा कोट टि्वट केला आहे. "डुकराशी कुस्ती खेळू नये, हे मी आधीच शिकलो आहे. तुमच्या अंगाला घाण लागते, पण डुकराला ते आवडतं" असा कोट फडणवीस यांनी टि्वट केला आहे.

नवाब मलिकांनी काय आरोप केले?

"मुन्ना यादव हा नागपूरचा कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर हत्येपासून सगळे गुन्हे दाखल आहेत. त्याला कन्स्ट्रक्शन वर्कर बोर्डाचं अध्यक्ष का बनवलं? मुन्ना यादव तुमच्या गंगेत आंधोळ करुन पवित्र झाला का?" असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला.

नवाब मलिक यांनी हैदर आझमचेही नाव घेतले. "हैदर आझम नावाच्या एका नेत्याला मौलाना आझाद फायनान्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष बनवलं होत का? हैदर आझम बांगलादेशातील लोकांना मुंबईत आणून स्थायिक करण्याचे काम करत नाही का? आझमची दुसरी पत्नी बांगलादेशी आहे. तिची मालाड पोलिसांनी चौकशी सुरु केली. २४ परगणा पोलीस ठाण्यात कागदपत्रं पाठवण्यात आली. बंगाल पोलिसांनी कागदपत्र नबवट असल्याचं सांगितलं. मालाड पोलिसांनी खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करुन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला" असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तुमच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रात पैसे उकळण्याचे काम सुरु होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif on Sunetra Pawar : सुनेत्रा पवार-प्रशांत किशोर भेटीवर हसन मुश्रीफांचं सूचक मौन; "मुंबईत काय घडलं माहिती नाही"

Bhira Hydroelectric Project : मुंबईच्या पाणीप्रश्नावर मोठा तोडगा! कोयना नव्हे, आता 'मुळशी'तून पश्चिमेकडे पाणी वळवण्याची मागणी; भिरा प्रकल्पातील 300 मेगावॉटमुळे होणार फायदा?

Gold Rate Today: बापरे! सोनं 84,000 हजारांनी महागलं; 4 दिवसांत मोठी वाढ; आता किती रुपयांना मिळतंय?

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवर हसन मुश्रीफ काय म्हणाले

Katraj Dairy Milk Price: कात्रज डेअरीच्या दूध दरात वाढ; दुग्धजन्य पदार्थही महागणार... किती पैसे मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT