omicron Sakal
मुंबई

महाराष्ट्रात ओमिक्रॉन पसरतोय; रूग्ण संख्या 28 वर

विदेशातील प्रवाशांना RT-PCR चाचणीचे प्री-बुकींग करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

निनाद कुलकर्णी

मुंबई : दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन विषाणूने आता जगासह भारतातदेखील हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी महाराष्ट्रात ओमिक्रॉन विषाणूची लागण झालेल्या 8 रूग्णांची नव्यान नोंद करण्यात आली आहे. यातील 7 रूग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत तर, एक जण वसई-विरार येथील आहे. त्यामुळे आतापर्यंत या विषाणूची लागण झालेल्या रूग्णांची संख्या महाराष्ट्रात आता 28 वर पोहोचली आहे. तर देशात हीच संख्या 60 झाली आहे.

राज्यात आज 684 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 686 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 93 हजार 688 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के आहे. राज्यात आज 24 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी RT-PCRचे प्री-बुकिंग अनिवार्य

ओमिक्रॉन विषाणूची वाढत्या रूग्ण संख्येमुळे विदेशातून भारतात दाखल होणाऱ्या प्रवाशांना भारतात दाखल होण्यापूर्वी RT-PCR चाचणीचे प्री-बुकींग करणे अनिवार्य करण्यात आले आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (MoCA) 14 डिसेंबर रोजी हे आदेश जारी केले आहेत. देशातील सहा विमानतळांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. यामध्ये दिल्ली, मुंबईसह, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता या शहरांचा समावेश असणार आहे.

खोट्या RT-PCR रिपोर्टप्रकरणी चौघांना अटक

भारतात आढळलेल्या पहिल्या ओमिक्रॉन रूग्णाला खोटा RT-PCR रिपोर्ट दिल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. देशात कर्नाटकमध्ये दक्षिण अफ्रिकेत आढळलेला ओमिक्रॉन विषाणूचा पहिला रूग्ण आढळून आला होता. 20 नोव्हेंबरला दक्षिण अफ्रिकेतून भारतात गाखल झालेल्या 66 वर्षीय प्रवाशाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. (First Omicron Case Recorded In Karnataka) तसेच त्याचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यात या व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.

दरम्यान संबंधित व्यक्तीने 23 नोव्हेंबर रोजी खासगी लॅबमधून कोरोना टेस्ट केली. त्यात त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर या व्यक्तीने अटक करण्यात आलेल्या व्यक्तींशी संपर्क साधला, त्यानंतर या भामट्यांनी संबंधित व्यक्तीला शहरातील एका खासगी प्रयोगशाळेत जाऊन बनावट आरटी-पीसीआर अहवाल तयार करून घेतला. 26 नोव्हेंबरला रिपोर्ट मिळाल्यानंतर लागण झालेल्या व्यक्तीने या रिपोर्टच्या आधारे 28 नोव्हेंबर रोजी दुबईमार्गे दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

Bigg Boss Marathi 6 Live Update: महाराष्ट्राची धक्का गर्ल प्राजक्ता शुक्रेची 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात एंट्री

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

BBM 6 UPDATE:'लक्ष्मीनिवास' फेम अभिनेत्रीची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री; प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का

SCROLL FOR NEXT