Mumbai-Pune Expressway News 
मुंबई

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे प्रवास होणार आणखी फास्ट! वाहतूक कोंडीपासून होणार सुटका

रोहित कणसे

पुणे ते मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या महामार्गावरून प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे. कारण एमएसआरडीसी (msrdc)ने या द्रुतगती महामार्गावरील दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी एक लेन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. असा प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. तो मंजूर होताच या लेनचं बांधकाम सुरू होणार आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे नियमीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या प्रवासादरम्यान नागरिकांना मोठ्या वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून आता या महामार्गावरील दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक लेन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एमएसआरडीसी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी तब्बल ५ हजार कोटींचा खर्च होणार आहे. साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

मुंबई - पुणे शहरांना जोडणारा हा ९४ किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग २००२ मध्ये तयार करण्यात आला होता. मात्र यानंतर दिवसेंदिवस या महामार्गावरील वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यानंतर या मर्गावर अपघात आणि वाहतुक कोंडी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर यावर उपाय योजना राबवण्याची मागणी केली जात आहे. आता ही लेन वाढवताना अतिरिक्त जागेसाठी जमीनीचे संपादन देखील करावे लागणार आहे. तसेच या महामार्गावर नवे १० बोगदे देखील होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT