मुंबई

लग्नाच्या वाढदिवसाआधीच प्रियांका-निकच्या आयुष्यात नवा पाहुणा

प्रेरणा जंगम

प्रियांका चोप्रा मागील काही दिवस भारतात होती आणि नेटफ्लिक्सच्या The White Tiger या सिनेमाचे चित्रीकरणही करत होती. चित्रीकरण करत असताना प्रियांका मुंबई आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी राहिली होती. काही दिवसांत प्रियांकाला काही कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्येही पाहिलं गेलं होतं.

प्रियांका चोप्रा मागील काही दिवस पति निक जोनास पासून दूर होती. आणि आता काम संपवून दोघं पुन्हा एकदा एकत्र भेटले आहेत. 1 डिसेंबर रोजी दोघांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. मात्र या वाढदिवसाआधीच त्यांच्या घरी आलाय एक नवा पाहुणा. हा पाहुणा म्हणजे प्रियांकाची निकला खास भेट आहे. नुकतच या नव्या सदस्याला घेऊन प्रियांका निकला भेटण्यासाठी गेली होती.

प्रियांका जेव्हा निक जोनासला भेटली तेव्हा निकसाठी एक सरप्राईज गिफ्ट द्यायचं तिने ठरवले. हे सरप्राईज गिफ्ट दुसरे काही नसून एक जर्मन शेफर्ट पपी होता. निक झोपेत असताना अचानक प्रियांका हे सरप्राईज घेऊन त्याच्या बेडजवळ गेली. निकने जेव्हा या पपीला पाहिले तेव्हा त्यालाही आश्चर्य झालं. निक आणि प्रियांका या दोघांनाही प्राण्यांची आवड आहे. प्रियांकाजवळ आधीच डायना नावाची गोड पपी आहे. आणि आता निकला सरप्राईज देण्यासाठी प्रियांकाने ही नवी युक्ती सुचवली. सोशल मिडीयावर तर निकचे या पपीसोबतचे फोटो चर्चेत आले आहेत.

Webtitle : new member in priyanka chopra and nick jonas family 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Corporation Election 2026 Voting LIVE Updates : पुण्यात बोगस मतदानाचा अजब प्रकार, मतदान केंद्रावर महिला न येतच तिच्या नावाने कोणीतरी दुसरच करून गेलं मतदान

६,६,६,६,६,६,६,६...! KKR च्या 'ट्रम्प कार्ड'चे वादळी शतक, २ कौटींचा फायद्याचा सौदा; IPL 2026 मध्ये प्रतिस्पर्धींना भरणार धडकी Video

Mohol Nagar Parishad : मोहोळ नगरपरिषदेत 'हायव्होल्टेज' ड्रामा! उपनगराध्यक्षपदासाठी नेत्यांकडे इच्छुकांची मोठी पायपीट!

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शरद पवार गट सक्रिय, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे घेणार मुलाखती

Ahilyanagar News: महानगरपालिका निवडणुकीदरम्यान भाजप आणि शिवसेना समर्थकांमध्ये राडा; ५ जण जखमी, काय घडलं?

SCROLL FOR NEXT