new members elected of state women commission
new members elected of state women commission  
मुंबई

राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी सहा जणींची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी सहा जणींची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे. त्यामधे चंद्रिका चौहान (सोलापूर), अनुसया गुप्ता (नागपूर), ज्योती भोये (जव्हार, जि. पालघर), रोहिणी नायडू (नाशिक), रिदा रशीद (मुंबई) आणि गयाताई कराड (परळी, जि. बीड) यांचा समावेश आहे. यापैकी गयाताई कराड यांची फेरनियुक्ती आहे. 

आयोगाच्या अध्यक्षपदी श्रीमती विजया रहाटकर यांची यापूर्वीच फेरनियुक्ती झालेली आहे. नव्या सदस्यांच्या नियुक्तीची अधिसूचना 13 सप्टेंबर 2019मध्ये राजपत्रात प्रसिद्ध झालेली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ नुसार आयोगामधे सात सदस्य असतात. त्यानुसार सातही सदस्यांची नियुक्ती आता झालेली आहे. याशिवाय राज्याचे पोलिस महासंचालक हे आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात. त्यानुसार पोलिस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल हे ही आयोगाचे सदस्य आहेत. 

सोलापूरच्या चंद्रिका चौहान या ‘उद्योगवर्धिनी’ संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी दीर्घकाळ कार्यरत आहेत. नागपूरच्या अनुसया गुप्ता या महिला दक्षता समिती, 'लोकपंचायत'च्या माध्यमातून सक्रिय आहेत. जव्हारच्या ज्योती भोये या पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत. अादिवासी महिलांसाठीचे त्यांचे काम आहे. नाशिकच्या रोहिणी नायडू या अनेक सामाजिक संस्थाशी निगडीत आहेत. विशेषत: आरोग्य क्षेत्रात त्यांचे मोठे काम आहे. मुंबईच्या रिदा रशीद यांनी अल्पसंख्यांक समूहातील महिलांसाठी उत्तम काम केले आहे. शिक्षण व कौशल्य यावर त्यांचा भर असतो. गयाताई कराड या ही मराठवाडयातील महिलांसाठी कार्यरत आहेत. या नव्या सदस्यांचे अध्यक्षा विजया रहाटकर यांनी स्वागत केले आहे. आयोगाच्या कामाला व वेगाला आणखी गती मिळेल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. 

विंदा कीर्तीकर, देवयानी ठाकरे, नीता ठाकरे, अॅड. आशा लांडगे या मावळत्या सदस्यांच्या योगदानाबद्दलही रहाटकर यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT