Mumbai Flood Sakal
मुंबई

Mumbai Flood : मुंबईत पाणी भरण्याची नवी ठिकाणे तयार होताहेत

मुंबईच्या भौगोलिक स्थितीनुसार अतिवृष्टीच्या काळात समुद्राला मोठी भरती असल्यास सखल भाग जलमय होतो.

विष्णू सोनवणे

मुंबईच्या भौगोलिक स्थितीनुसार अतिवृष्टीच्या काळात समुद्राला मोठी भरती असल्यास सखल भाग जलमय होतो.

मुंबई - मुंबईच्या भौगोलिक स्थितीनुसार अतिवृष्टीच्या काळात समुद्राला मोठी भरती असल्यास सखल भाग जलमय होतो. 50 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाचा निचरा करण्याची क्षमता पर्जन्य वाहिन्यांमध्ये नाही. 1993 पासून ढेपाळलेल्या ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाचा खर्च 3238 कोटी रुपयांवर पोचला आहे. पूरावर तात्पुरती मलमट्टी केली मात्र दिर्घकालिन उपायोजना नसल्याने मुंबईत पावसाळ्यात पाणी भरण्याची नवी ठिकाणे तयार होत असल्याचे चिंता व्यक्त होत आहे.

भविष्यातील पुरस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे समिती नेमली. या समितीच्या शिफारशीनुसार मुंबईत 1993 पासून ब्रिमस्टोवॅड प्रकल्प राबविण्यास सुरूवात झाली. या प्रकल्पामुळे 50 मिलिमीटर इतक्या पाण्याचा निचरा होत आहे. अतिवृष्टी आणि समुद्राच्या भरतीच्या पाण्याचा निचरा होत नाही. पालिकेच्या नियोजनाचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे.

नव्या ठिकाणी पाणी भरू लागले

मुंबईला दरवर्षी पावसाळ्यात पुराशी सामना करावा लागतो. किंग्ज सर्कल, हिंदमाता, माटुंगा, कुर्ला, सायन, माहिम ही पुराचे पाणी भरण्याची हमखास ठिकाणे. गेल्या वर्षी येथील काही ठिकाणी पाण्याचा निचरा लवकर झाला. त्यामुळे स्थानिकांना दिलासा मिळाला. मात्र मुंबईत नवी ठिकाणे तयार होत असल्याबद्दल पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या अधिका-यांनाच चिंता वाटू लागली आहे. उच्च न्यायालय, मलबार हिल, मरिनड्राईव्ह, पारशी कॉलनी, शीव पूर्व आदी ठिकाणी नव्याने पाणी भरू लागले आहे. आता पाणी भरण्याची नवी ठिकाणे तयार होत आहेत.

काही ठिकाणी पाणी भरणा-या पाण्याचा निचरा करण्यासाठी पाण्याच्या साठवण टाक्या तयार करण्यात आल्या आहेत. मात्र ही तात्पुरती उपायोजना असून कायमस्वरूपी उपायोजनेचा दुष्काळ असल्याचे दिसून येत आहे. पाणी भरण्याची नवी ठिकाणे तयार होवू लागल्याने काही माजी पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या अधिका-यांनी चिंता व्यक्त केली आहे.

पंप ही धुळफेक

मुंबईत दरवर्षी सुमारे अडीचशे ते पावणे तीनशे पंप पुराच्या पाण्याचा उपसा करण्यासाठी वापरले जातात. अनेक ठिकाणी पाण्याचा उपसा केलेले पाणी दुस-या टोकाकडून पुन्हा त्याच ठिकाणी शिरते. त्यामुळे पंप ही धुळफेक ठकते. कंत्राटदारांना पोसण्यासाठी पंपांचा उपयोग होत असल्याच्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारी दरवर्षी येत असतात. मात्र त्याची दखल घेतली जात नाही.

पुढील 20 वर्षांचे प्लानिंग हवे

पुढील वीस पंचवीस वर्षात मुंबईतील पूराबाबत दीर्षकालिन उपायोजना राबवाव्यात. नियोजन करावे, विभागवार नियोजन करावे, टप्प्या पट्ट्याने हे काम करावे, त्यासाठी पालिकेच्या तज्ज्ञ अधिका-यांची टीम तयार करावी, नियोजनबध्द आणि कालबध्द काम करावे त्याशिवाय ही समस्या सुटणार नाही.

- रवी राजा, माजी विरोधी पक्षनेते, मुंबई महानगर पालिका

पुरासाठी सज्ज, प्रशासनाचा दावा

ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाच्या कामाच्या टक्केवारीबाबत पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या अधिका-यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे पुरेशी माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पुराबाबत आमची यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

- ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाची सुरूवात -- सन १९९३

- क्षमता -- ताशी ५० मिलिमीटर पावसाचे पाणी वाहून नेण्याची

- प्रकल्पाचा सुरुवातीचा खर्च -- १२०० कोटी रुपये

- ब्रिमस्टॉवॅडचा आतापर्यंतचा खर्च -- 3,२३८.०४ कोटी रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT