देवनार पशुवधगृहात ताडपत्री घोटाळा? 
मुंबई

देवनार पशुवधगृहात ताडपत्री घोटाळा?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : देवनारच्या पशुवधगृहामध्ये ताडपत्रीच्या कंत्राटात घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत झालेल्या तपासणी केंद्राच्या अहवालात देवनार पशुवधगृहामध्ये निर्धारित जाडीऐवजी कमी जाडीची ताडपत्री पुरवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय 
प्रशासनाने घेतला आहे.

देवनार पशुवधगृहामध्ये बकरी ईददरम्यान जनावरांचा बाजार भरतो. त्या वेळी या जनावरांसाठी विक्रेते तसेच इतर कामांसाठी निवारा शेड उभारले जातात. त्याबाबतची निविदा काढून पालिका त्याचे कंत्राट देते. हे शेड उभारण्यासाठी पालिकेने ठरवलेल्या निकषानुसार साहित्य वापरावे लागते. या वेळी चार कंत्राटदारांना हे कंत्राट देण्यात आले होते. मागील वर्षी दोनशे ग्रॅम प्रति चौरस मीटर या निकषाने ताडपत्री पुरवण्याची अट पालिकेने घातली होती.

त्याची तपासणी सूक्ष्म, लघु और मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत असलेल्या तपासणी केंद्राच्या अधिकाऱ्यांनी पशुवधगृहातील अभियंत्यांच्या उपस्थितीत केली. त्यामध्ये ही ताडपत्री कमी जाडीची असल्याचे समोर आले. त्यामुळे सुमारे तीन कोटी रुपयांच्या या कंत्राटाचे देयक पालिकेने अडवले आहे. पशुवधगृहाचे व्यवस्थापक डॉ. योगेश शेट्ये यांनी तपासणी अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवला असून या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे 
त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi cabinet: राज्यसभा तिकिटांनंतर मोदींच्या मंत्रिमंडळात मोठा बदल? चार मंत्र्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांची चर्चा... कुणाला संधी?

Gold Price Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! उच्चांकापासून ₹31,000 स्वस्त; दसऱ्याआधी किती रुपयांना विकलं जातंय सोनं?

रायफल साफ करताना अचानक गोळी सुटली, लोणावळ्यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा मृत्यू

अधिकाराचा गैरवापर करत कैद्याची सुटका, बदल्यात पत्नीशी संबंध ठेवले; उपमहानिरीक्षकाला अटक; पोलीस दलात खळबळ

Marathi News Live Updates: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून फ्लाय९१ची सेवा सुरू

SCROLL FOR NEXT