मुंबई

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, आज ठाणे-कल्याण दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक

प्रशांत कांबळे

मुंबईः मध्य रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत आज विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी आपल्या उपनगरी मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कुर्ला आणि वाशी-पनवेल विभागात विशेष गाड्या चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते दुपारी 4.30 या वेळेत ट्रान्स हार्बर लाइन, मेन लाइन मार्गे प्रवास करण्याची परवानगी राहील.

कुठे
ठाणे-कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर

 
कधी
सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 दरम्यान

परिणाम

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.37 ते दुपारी 2.48 पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि ठाणे ते कल्याण दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील. त्यासोबतच कल्याण येथून सकाळी 10.26 ते दुपारी 3.19 पर्यंत सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. या सेवा कल्याण ते ठाणे दरम्यानच्या सर्व
स्थानकांवर थांबून पुढे मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळविण्यात येतील आणि आपल्या निर्धारित थांब्यांवर थांबतील.

कुठे 
कुर्ला-वाशी अप व डाउन हार्बर मार्गावर

 
कधी 
सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 दरम्यान

परिणाम

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.39 या वेळेत सुटणाऱ्या बेलापूर,पनवेल, वाशीसाठीच्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी 10.21 ते दुपारी 3.41 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

--------------------------

(संपादनः पूजा विचारे)

News railway passengers megablock on both Thane Kalyan routes today

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad Politics: कराडमध्ये नगरसेवकांचे शक्तिप्रदर्शन; आमदार अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित मतदान

तारिणी मालिकेतून 'या' अभिनेत्रीची एक्झिट, सोशल मीडियावर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली...

Smartphone Ban : 'या' देशात सरकारी कर्मचाऱ्यांच्या स्मार्टफोन वापरावर बंदी, आदेश झुगारल्यास नोकरीला मुकावे लागणार, तुरुंगवासही होणार

Gokul Election Update : 'गोकुळ'च्या यादीतून ६२६ दूध संस्थांना डच्चू; ५ हजार ४७० पैकी ४ हजार ८४४ संस्थाच ठरल्या पात्र, नवी यादी जाहीर, आता कोणाचे बिघडणार गणित?

Crime News: वाळू माफियांचा रक्तरंजित हल्ला! फॉर्च्युनरमध्ये अडकवून भाजप नेत्यासह तिघांना जिवंत जाळलं

SCROLL FOR NEXT