Vaccination  esakal
मुंबई

मुंबईतील लसीकरणासंदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी

ही बातमी एकदा वाचाच.

दीनानाथ परब

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या (corona wave) पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये लसीकरणाबद्दल मोठ्या प्रमाणावर जागरुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने लसीकरण करुन घेत आहेत. पण सध्या लसींची मागणी आणि पुरवठ्यामध्ये मोठी तफावत आहे. (vaccination) नागरिक लसीकरणासाठी तयार आहेत. पण तितक्या प्रमाणात लसीच उपलब्ध होत नाहीयत. (next two vaccination is closed in mumbai)

त्यामुळे अनेकवेळा नागरिकांना लस केंद्रावर येऊन विनालस माघारी फिरावे लागतेय. लसींच्या याच तुटवड्यामुळे राज्य सरकारने १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण स्थगित केले आहे. व त्या वयोगटाच्या लसी ४५ वर्षापुढील नागरिकांकडे वळवल्या आहेत. कोव्हॅक्सिन असो कोव्हिशिल्ड या लसींचे दुसरे डोस उपलब्ध होत नाहीयत. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढतेय.

आता सरकारने ज्यांचा लसींचा दुसरा डोस आहे, त्यांना प्राधान्य द्यायचे ठरवले आहे. दरम्यान उद्या आणि परवा मुंबईत लसीकरण बंद राहणार आहे. आम्ही सूचित करू इच्छितो की १५ व १६ मे, २०२१ रोजी लसीकरण प्रक्रिया बंद ठेवण्यात येत आहे. लसीकरणाविषयी पुढील माहिती आपल्याला लवकरच कळवण्यात येईल, असे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उन्हाचा चटका अन् वादळी पावसाचाही तडाखा बसणार, कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भाला हवामान विभागाचा इशारा

शरण आलेल्या माओवाद्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया, कौटुंबिक आयुष्य सुखकर होणार

युद्ध थांबणं कठीण! इराणच्या अटी ठरू शकतात अडथळा, होर्मुझ टोल ते लष्करी तळ; अमेरिकेसमोर काय अटी?

Surat Station Redevelopment: A Boost for Mumbai-Gujarat Connectivity : मुंबई-सुरत लोकल सेवा सुरू होणार? सुरत स्टेशनवर सुरू असलेल्या 'या' कामांमुळे चर्चेला उधाण.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

SCROLL FOR NEXT