sachin vaze arrested
sachin vaze arrested 
मुंबई

Breaking - सचिन वाझे यांना NIA ने केली अटक; हिरेन प्रकरणी 12 तासांच्या चौकशीनंतर कारवाई

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मनसुख हिरेन प्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तब्बल 12 तास चौकशी केल्यानंतर सचिन वाझेंना एनआयएने अटक केली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अॅण्टालिया निवासस्थाना समोर स्फोटकांनी  सापडलेल्या स्कॉर्पीओ गाडी प्रकरणात ही महत्वाची अटक मावली जात आहे. जी गाडी अंबानी यांच्या घराबाहेर सापडली. तिचे मालक मनसुख हिरेन यांना वाझे हे आधीपासून ओळखत होते. संबधित गाडी ही वाझे यांच्याजवळ होती असे आरोप वाझेंवर होते. तर पाच तासांच्या चौकशीनंतर दहशतवाद विरोधी पथकाचे श्रीपाद काळे व गुन्हे शाखेचे ACP नितीन अलकनुरे NIA  कार्यालयातून बाहेर पडले.

अटकपूर्व जामीनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यांच्या अटकपूर्व जामिनावर 19 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता त्यांची अटक झाली आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सचिन वाझेंनी जामीनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांची अटक निश्चित मानली जात होती. 

किरिट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं की,  "शिवसेनचे माजी प्रवक्ता पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी आता अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतलीय. तर एटीएसचा निष्कर्ष आहे की मनसुख हिरेन यांची हत्या झालीय. मग ठाकरे सरकार सचिन वाझे यांना अटक का करत नाही." असा प्रश्नही सोमय्या यांनी विचारला होता. 

भाजपच्या इतर नेत्यांनी सुद्धा सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी करत ठाकरे सरकारवर टीका केली होती. सचिन वाझे सारख्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला सरकार इतके का घाबरते असा प्रश्‍न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. सरकारचे असं काय गुपीत त्याच्याकडे आहे ज्यामुळे सरकार अडचणीत येईल असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT